व्यावसायिकाची साडेतीन लाखांची लूट

By Admin | Updated: July 13, 2015 23:53 IST2015-07-13T23:45:54+5:302015-07-13T23:53:03+5:30

उपनगरची घटना : संशयितांचे पलायन

The looters of the businessman's three lakhs | व्यावसायिकाची साडेतीन लाखांची लूट

व्यावसायिकाची साडेतीन लाखांची लूट

नाशिकरोड : मद्यविक्रीतून जमा झालेली साडेतीन लाख रुपयांची रोकड घरी घेऊन जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या संशयितांनी मारहाण करून ही रक्कम लुटून नेल्याची घटना रविवारी (दि़१२) रात्रीच्या सुमारास उपनगर बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला
आहे़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर येथील रहिवासी महेश भानुदास दर्यानी यांचे सिन्नरला मद्यविक्रीचे दुकान आहे़ रविवारी रात्री महेश दर्यानी हे आपल्या चुलतभावासमवेत नेहेमीप्रमाणे येत असताना कारमधून आलेल्या संशयितांनी त्यांना उपनगर बसस्थानकात अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली़
या प्रकारामुळे घाबरलेले दर्यानी व त्यांच्या चुलतभावाने आपल्याकडील साडेतीन लाखांची रोकड सांभाळत प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला़ मात्र संशयितांनी त्यांना जबर मारहाण करीत त्यांच्याजवळील रोकड लुटून नेली़ या प्रकरणी दर्यानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा
गुन्हा दाखल करण्यात आला
आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The looters of the businessman's three lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.