सटाण्यात तोतया पोलिसाकडून दीड लाखांची लूट

By Admin | Updated: March 11, 2017 00:43 IST2017-03-11T00:16:27+5:302017-03-11T00:43:51+5:30

सटाणा : दोन तोतया पोलिसांनी अंगावर जास्त दागिने घालू नका असे सांगून भरदिवसा एका महिलेच्या अंगावरील दीड लाखांचे दागिने लुटून पोबारा केला.

Looted robbery in police station | सटाण्यात तोतया पोलिसाकडून दीड लाखांची लूट

सटाण्यात तोतया पोलिसाकडून दीड लाखांची लूट

सटाणा : दोन तोतया पोलिसांनी अंगावर जास्त दागिने घालू नका असे सांगून भरदिवसा एका महिलेच्या अंगावरील दीड लाखांचे दागिने लुटून पोबारा केला. हा प्रकार आज शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे शहरात पुन्हा सोनसाखळी
चोरांची टोळी सक्रिय झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आला आहे.
बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील ताईबाई पंडित देसले (६५) ही वृद्ध महिला आज सकाळी बँकेच्या कामासाठी सटाणा येथील बच्छाव हॉस्पिटलनजीकच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेत आल्या होत्या. बँक उघडण्यापूर्वी बॅँकेजवळ दोघांनी आम्ही पोलीस असून, आमच्या साहेबांनी अंगावर इतके दागिने घालण्यास मनाई केली आहे. ते काढून पिशवीत ठेवा, असे ठणकावले. ताईबाई देसले यांनी अंगातील सोन्याच्या दोन माळा, सोन्याची बांगडी पिशवीत टाकत असताना सोने लुटून दोघांनी मोटारसायकलने पोबारा केला. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Looted robbery in police station