मानूर जकात नाक्यावर लूट

By Admin | Updated: November 19, 2014 01:30 IST2014-11-19T01:30:10+5:302014-11-19T01:30:41+5:30

मानूर जकात नाक्यावर लूट

Looted manur octroi nose | मानूर जकात नाक्यावर लूट

मानूर जकात नाक्यावर लूट

पंचवटी : चंद्रपूर जिल्ह्यातून नाशिकला मखमलाबाद शिवारात सीमेंट गोण्या घेऊन येणाऱ्या ट्रकचालकाची मानूर जकात नाक्यावर लूट करून ट्रक घेऊन पलायन करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या पथकाने अवघ्या काही तासांतच पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक इंडिका कार, तलवार तसेच चाकू अशा वस्तू जप्त केल्या आहेत. याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील मनोहर कालिदास सुरे या चालकाने आडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकखेडे येथून ट्रक (क्र. एमएच ३४ एटी ३४६४) मध्ये ४५० सीमेंट गोण्या घेऊन नाशिकला मखमलाबाद शिवारात सुरू असलेल्या शाळेच्या ठिकाणी येत होते. रात्री साडेअकरा वाजता ते जकात नाक्यावर आल्यानंतर त्यांनी गाडी बाजूला उभी करून ते झोपण्याच्या तयारीत होते. त्याच दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील संशयित आरोपी इम्रान मुस्ताक शेख, अक्षय भानुदास गोसावी, बापू हौशिराम इंदोरे, रूपेश दामोदर भालेराव, हसिन शमशोद्दीन मणियार (रा. दोडी, सिन्नर), जाकिर रऊफ काझी (खडकाळी, भद्रकाली) यांनी सुरे यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील सात हजार रुपयांची रोकड जबरीने काढून घेतली व त्यानंतर सीमेंट गोण्या भरलेला ट्रक घेऊन पलायन केले, तर उर्वरित इंडिका कार (क्र. एमएच १४ एक्स-१२९९) मधून निघून गेले.
संशयित सदरचा ट्रक घेऊन राणेनगर रस्त्याने जात असताना गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या कर्मचाऱ्यांचे लक्ष वेगाने जाणाऱ्या ट्रककडे गेले. पोलिसांनी ट्रकबाबत चौकशी केली असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून ट्रकमधील संशयितांना ताब्यात घेतले व संशयितांनी ट्रकचालकाला लुटून ट्रक पळविल्याची कबुली दिली. त्यानंतर उर्वरित आरोपींची चौकशी केली असता ते इंडिका कारमधून येत असल्याबाबत सांगितल्याने पोलिसांनी सापळा रचून इंडिकातून पळणाऱ्या अन्य संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Looted manur octroi nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.