सराफी दुकानातून साडेतीन लाखांचे दागिने लुटले

By Admin | Updated: November 26, 2015 23:19 IST2015-11-26T23:19:20+5:302015-11-26T23:19:49+5:30

सराफी दुकानातून साडेतीन लाखांचे दागिने लुटले

Looted jewelery worth 3.5 tray from Sarai Shops | सराफी दुकानातून साडेतीन लाखांचे दागिने लुटले

सराफी दुकानातून साडेतीन लाखांचे दागिने लुटले

लासलगाव : येथील स्टेशन रस्त्यावरील गुंजाळ पेट्रोल पंपासमोरील मे.जे.आर.ठाकूर या सराफी दुकानाची मागील भिंत फोडून चोरट्याने सुमारे तीन लाख पन्नास हजार रु पये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली.
याबाबत दुकानाचे चालक नितीन शांताराम ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , दि. २६ रोजी सकाळी १० वाजता दुकान उघडले असता दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले, दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची वायर व एक कॅमेरा तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. दुकाना मागील खोलीतील मागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करताच प्रथम सीसीटीव्ही फुटेजची वायर व एक कॅमेरा तोडून दुकानातील ग्रॅम वजनाची सोन्याची मोड व काऊंटरमधील ड्रॉवरमध्ये ठेवलेले चांदीच्या तोरड्या, जोडवे, सरी, कडे असा १० किलो चांदीचा असा अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आऱबी़ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक आवारे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Looted jewelery worth 3.5 tray from Sarai Shops