इगतपुरी येथे पर्यटकाची लूट
By Admin | Updated: August 17, 2016 23:57 IST2016-08-17T23:56:34+5:302016-08-17T23:57:29+5:30
इगतपुरी येथे पर्यटकाची लूट

इगतपुरी येथे पर्यटकाची लूट
इगतपुरी : शहरातील नगर परिषदेच्या तलावाजवळ फिरायला आलेल्या पर्यटकाच्या वाहनाची काच फोडून वाहनातील सोन्याच्या दागिन्यांसह लॅपटॉपची चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
धबधबा बघण्यासाठी शाहीद पटेल, रा. उत्तमनगर, नाशिक हे कुटुंबीयांसोबत आले. पटेल हे फिरून आल्यानंतर त्यांच्या वाहनाची मागील बाजूची काच फोडलेली दिसली. या प्रकरणी पोलिसांनी सुनील केंग (२० रा. गोळीबार मैदान, इगतपुरी) या संशयिताला अटक केली असून, त्याला इगतपुरी न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पो.नी. संजय शुक्ला यांच्या मार्ग दर्शनाखाली गंगावने, रामदास गांगुर्डे करत आहे. (वार्ताहर)