भाविकांची लूट सुरूच
By Admin | Updated: July 28, 2015 22:46 IST2015-07-28T22:45:13+5:302015-07-28T22:46:16+5:30
भाविकांची लूट सुरूच

भाविकांची लूट सुरूच
पंचवटी : शहरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देवदर्शन चांगलेच महागात पडत असून, भाविकांचे पैसे चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ यामुळे गंगाघाटावरील पोलीस बंदोबस्त तसेच लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
सिंहस्थ कुंभपर्वात रामकुंडात स्नान करून पुण्य कमविण्यासाठी भाविका मोठ्या संख्येने गंगाघाटावर येतात़ याठिकाणी आल्यानंतर चोरट्यांकडून त्यांच्या पर्स तथा पाकीट चोरी होत असल्यामुळे त्यांच्या समस्येत भरच पडते आहे़ ममता समीर पटेल (रा़ शांती आशिष विलेपार्ले, मुंबई) देवदर्शनासाठी पंचवटीत आल्या होत्या़ रामकुंडावरील स्नानानंतर त्या कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता चोरट्यानी त्यांच्या पर्समधील पाकीट चोरून नेले़ या प्रकरणी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)