भरतीसाठी आलेल्या उमेदवाराची लूट

By Admin | Updated: June 30, 2014 01:27 IST2014-06-30T01:26:26+5:302014-06-30T01:27:54+5:30

भरतीसाठी आलेल्या उमेदवाराची लूट

The loot of a candidate for the recruitment | भरतीसाठी आलेल्या उमेदवाराची लूट

भरतीसाठी आलेल्या उमेदवाराची लूट

 

नाशिक : पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवाराला रिक्षाचालकाने लुटल्याची घटना रविवारी सकाळी घडली़ या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस दलाची रविवारी लेखी परीक्षा होती़ या परीक्षेसाठी संगमनेर तालुक्यातील धांदरफ ळ येथील विजय सीताराम खिलाडे हा रात्री नाशिकमध्ये आला़
रात्री अडीच वाजेच्या सुमारास गडकरी चौकातून सीबीएसकडे येण्यासाठी तो रिक्षामध्ये (एमएच१५ झेड ५५७८) बसला़ सीबीएस येथे उतरल्यानंतर खिलाडे व रिक्षाचालकाचा भाड्याच्या पैशावरून वाद झाला़ यानंतर रिक्षाचालकाने खिलाडेच्या खिशातील १४०० रुपये, पॅनकार्ड, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड, मतदान कार्ड ठेवलेले पॉकेट घेऊन पळून गेला़ या प्रकरणी विजय खिलाडे याने दिलेल्या फि र्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The loot of a candidate for the recruitment