शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

नाशिक महापालिकेसह सत्ताधारी भाजपाचेही  ‘स्वच्छ सर्वेक्षण’च्या निकालाकडे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:25 IST

शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, निकालाकडे नाशिक महापालिकेसह सत्ताधारी भाजपाचेही लक्ष लागून आहे. यंदा गत वर्षाच्या तुलनेत कामगिरी उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिक : शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, निकालाकडे नाशिक महापालिकेसह सत्ताधारी भाजपाचेही लक्ष लागून आहे. यंदा गत वर्षाच्या तुलनेत कामगिरी उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  गेल्या तीन वर्षांपासून केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविली जात आहे. पहिल्या वर्षी देशभरातील ७३ शहरांमध्ये, तर दुसऱ्या वर्षी ४३४ शहरांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. यंदा ४०४१ शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या वर्षी नाशिक शहराचा देशभरातील ७३ शहरांमध्ये ३१ वा क्रमांक आला होता, तर मागील वर्षी ४३४ शहरांच्या यादीत नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. खतप्रकल्पाचे केलेले खासगीकरण, नव्याने धावणाºया घंटागाड्या, गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी अभियान, स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात आलेली साडेसहा हजार शौचालये यामुळे नाशिकचा पहिल्या दहा ते वीस शहरांच्या यादीत क्रमांक लागेल, असा दावा प्रशासनाकडून छातीठोकपणे केला जात होता. नाशिकच्या अगोदर नवी मुंबई- ८, पुणे- १३, बृहन्मुंबई- २९, शिर्डी- ५६, पिंप्री चिंचवड- ७२, चंद्रपूर- ७६, अंबरनाथ- ८९, सोलापूर- ११५, ठाणे- ११६, धुळे- १२४, मीरा-भार्इंदर- १३०, नागपूर- १३७, वसई विरार- १३९, इचलकरंजी- १४१ या शहरांचा क्रमांक लागला होता. मागील वर्षी क्रमांकात घसरण झाल्यानंतर दत्तक घेतलेल्या नाशिकची सन २०१८ मध्ये होणाºया स्पर्धेत कामगिरी उंचावली पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने सहा महिने अगोदरच तयारी सुरू केली होती. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जागृतीवर भर देण्यात आला होता. सत्ताधारी भाजपाकडूनही मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मागील वर्षी ४ मे रोजी स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला होता. यंदा मात्र निकालाला उशीर झाला असून, निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. यंदा गतवेळच्या तुलनेत कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल, असा दावा प्रशासनातील अधिकाºयांकडून केला जात आहे.सत्ताधाºयांची प्रतिष्ठा पणालामागील वर्षी महापालिकेची सार्वजनिक निवडणूक होऊन भाजपा सत्तेवर आली. मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा १५१ वा क्रमांक आल्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपाने सदर स्पर्धा मनसेच्या सत्ताकाळात झाल्याचे सांगत त्यातून आपली मान सोडवून घेतली होती. यंदा मात्र भाजपाच्या सत्ताकाळात सर्वेक्षण झाले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी गतवर्षाच्या तुलनेत कामगिरी उंचावण्याचा आग्रह धरलेला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपाच्या दृष्टीने यंदाचा निकाल हा प्रतिष्ठेचा बनला असून, निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका