शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस, तक्रारदारांवर कॅमेºयाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:40 IST

पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असतात. आता पोलीस ठाण्यातील हा सारा प्रकार उघड होणार आहे. ठाणे अंमलदाराच्या टेबलावरच कॅमेरा असून, तो तक्रारदार आणि पोलिसांच्याही हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.

संजय शहाणे ।इंदिरानगर : पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असतात. आता पोलीस ठाण्यातील हा सारा प्रकार उघड होणार आहे. ठाणे अंमलदाराच्या टेबलावरच कॅमेरा असून, तो तक्रारदार आणि पोलिसांच्याही हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.  पोलीस ठाण्यात पोलीस आणि तक्रारदार यांच्याविषयी बºयाचदा वादाचे प्रसंग उभे राहतात. गुन्हा कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार पोलीस सर्वसामान्यांशी वागत असतात. कित्येकदा पोलिसांना मोठ्या आवाजात बोलावे लागते, तर अनेकदा पोलीस तक्रारदाराचे ऐकूनही घेत नाहीत. सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात आला की तो गांगरून जातो. पोलीस त्यास अधिकच घाबरून सोडतात. हे आजवर केवळ बोलले जाते. परंतु आता या साºया बाबींवर कॅमेºयाची नजर राहणार असून, कोण कुणाशी कसा वागतो यावर कॅमेºयाची नजर राहणार आहे. यातून अनेक बाबींचा खुलासा तर होईलच पोलिसांच्या वर्तणुकीत थोडाफार संयम येऊ शकेल अशीही अपेक्षा बाळगली जात आहे.  ठाणे अंमलदाराच्या टेबलावर असलेल्या संगणकाजवळच हा कॅमेरा लावण्यात आला असून, हा ९० डीग्री कोनात फिरत असल्याने सर्व हालचालींवर या कॅमेºयाचे लक्ष असणार आहे. पोलीस ठाण्यातील अपप्रवृत्तींना यामुळे आळा बसलेच शिवाय एक चांगले कार्यसंस्कृतीलाही यामुळे सुरुवात होणार आहे. याचा सर्वाधिक लाभ तक्रादाराला होणार आहे. भयभीत अवस्थेत आलेल्या तक्रारदाराशी पोलीस संयमाने वागल्यानंतर दिलासा मिळणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात कॅमेरे पोलीस आणि तक्रारदार यांच्यातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणारा हा कॅमेरा शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात लावण्यात येणार आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याची सुरुवात झालेली आहे. सदर कॅमेºयात केवळ हालचालीच नव्हे तर आवाजही रेकॉर्ड होणार आहे. या कॅमेºयामुळे पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीत पारदर्शकता येणार असून, पोलीस आणि तक्रारदार यांच्यात सामंजस्यांनी विचारविनिमय शक्य होणार आहे. समन्यायातून पोलीस, सर्वसामान्यांचे संबंध सुधारावेत हादेखील यामागचा उद्देश आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा