अक्षय्य तृतीयेसाठी करा-केळी बनवण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 06:37 PM2019-04-27T18:37:23+5:302019-04-27T18:37:50+5:30

साडेतीन मुहूर्तंपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणासाठी करा-केळीला महत्त्व आहे. तेथून जवळच असणाऱ्या मºहळ येथील कुंभारवाड्यात करा-केळी बनविण्याच्या कामात कुंभार समाज व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

Long time to make banana-banana for the rest of the year | अक्षय्य तृतीयेसाठी करा-केळी बनवण्याची लगबग

अक्षय्य तृतीयेसाठी करा-केळी बनवण्याची लगबग

googlenewsNext

निºहाळे : साडेतीन मुहूर्तंपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणासाठी करा-केळीला महत्त्व आहे. तेथून जवळच असणाऱ्या मºहळ येथील कुंभारवाड्यात करा-केळी बनविण्याच्या कामात कुंभार समाज व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
करा-केळीसोबतच माठ, रांजण बनविण्याचे कामदेखील वेगाने सुरू आहे. येथील करा-केळी, माठ, रांजण यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. वैशाख महिन्यात प्रखर उन्हाची तीव्रता वाढते. त्याचा परिणाम सभोवतालच्या सृष्टीवरदेखील होतो. वैशाख महिन्यात अक्षय्य तृतीयचा सण येतो. यावर्षी हा सण ७ मे रोजी येत आहे. या सणाला आपल्या पूर्वजांचे पितरांचे पूजन केले जाते. यावेळी करा-केळी प्रतीक मानून त्यांची पूजा केली जाते. साडेतीन मुहूर्तातील एक सण असल्याने हिंदूंच्या प्रत्येक घरात तो परंपरागत साजरा केला जातो. तृषार्त पितरांना थंड पाणी मिळावे अशी श्रद्धा असल्याने करा-केळींना मोठी मागणी असते. तालुक्यात या वस्तूंना मोठी मागणी असल्याने दोन-तीन महिने अगोदरच तयारी करावी लागते. या हंगामी व्यवसायातून घराला लागणारी थोडीफार कमाई होत असल्याचे कुंभार समाजाचे भानुदास अष्टेकर, तुकाराम अष्टेकर, रामेश्वर अष्टेकर, शिवाजी अष्टेकर, गणपत अष्टेकर आदींनी सांगितले.

Web Title: Long time to make banana-banana for the rest of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.