दीर्घकालीन विचाराने ‘जीएसटी’चा लाभ

By Admin | Updated: July 3, 2017 02:00 IST2017-07-03T01:30:22+5:302017-07-03T02:00:30+5:30

नाशिक : वस्तू सेवा कर करप्रणाली प्रगत देशांनी अवलंबली आहे. या करामुळे गुंतवणुकीला फायदा होणार आहे,

Long Term Thinking 'GST' benefits | दीर्घकालीन विचाराने ‘जीएसटी’चा लाभ

दीर्घकालीन विचाराने ‘जीएसटी’चा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वस्तू सेवा कर (जीएसटी) करप्रणाली जगभरातील प्रगत दहा देशांनी अवलंबली आहे. या करामुळे जागतिक गुंतवणुकीला फायदा होणार आहे, तसेच सुरुवातीचे एक ते दीड वर्ष देशाच्या अर्थव्यवस्थेत नैराश्य असले तरी दीर्घकाळाचा विचार करता ही क र अंमलबजावणी फायद्याची ठरणार असल्याचे मत सीए ओमप्रकाश सोमाणी यांनी व्यक्त केले.शरणपूररोड येथील वैराज कलादालनात जागतिक वास्तुविशारद दिनानिमित्त ‘आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन, नाशिक’ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात सोमाणी यांनी ‘जीएसटी’ करप्रणालीबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले. या करप्रणालीमुळे देशाचा आर्थिक विकासदर वाढण्यासही मदत होणार आहे, तसेच प्र्रत्येक राज्यानुसार आकारण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या करप्रणालीला यानिमित्ताने आळा बसणार आहे. ही करप्रणाली राबविताना देशव्यापी संगणकप्रणाली कशी साथ देते हेदेखील पाहणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सोमाणी यांनी अधोरेखित केले.या कायद्यात अधिकाधिक सुसूत्रता यावी यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध परवानग्यांबाबत उलगडा होणे आवश्यक असल्याचे सीए ओमप्रकाश सोमाणी यांनी सांगितले. नवीन करप्रणालीमुळे नेमके काय प्रश्न निर्माण होतील याबाबत अद्याप सर्वसामान्य नागरिकांमध्ये तसेच व्यावसायिकांमध्ये शंका आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संघटनेचे अध्यक्ष सचिन गुळवे यांनी ‘आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन, नाशिकतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष योगेश कासार पाटील, सीए ओमप्रकाश सोमाणी, आर्कि टेक्ट डॉ. कृष्णभूषण महाशद्बे, अध्यक्ष सचिन गुळवे, सचिव चारूदत्त नेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्कि. रसिक बोथरा तर आभार आर्कि. चारूदत्त नेरकर यांनी मानले.

Web Title: Long Term Thinking 'GST' benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.