लोकमत टाइम्स कॅम्पस् क्लब नोंदणी
By Admin | Updated: August 10, 2014 02:03 IST2014-08-10T01:49:45+5:302014-08-10T02:03:28+5:30
लोकमत टाइम्स कॅम्पस् क्लब नोंदणी

लोकमत टाइम्स कॅम्पस् क्लब नोंदणी
नाशिक : लोकमत टाइम्स कॅम्पस् क्लब या विद्यार्थ्यांसाठी हक्काच्या व्यासपीठाच्या वर्ष २०१४-१५ च्या सदस्यता नोंदणीला आजपासून उत्साहात सुरुवात झाली़
‘लोकमत’च्या शरणपूर रोडवरील शहर कार्यालयात लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी़ बी़ चांडक, श्यामराव विठ्ठल बँकेचे विभागीय व्यवस्थापक बिपीन जोशी, बँकेच्या शरणपूररोड शाखेचे व्यवस्थापक दिनेश कामत, बलई कोशचे संचालक नीलेश छडवेलकर व उपस्थित विद्यार्थी- पालकांच्या हस्ते हवेत फु गे सोडून या नोंदणीचे उद्घाटन करण्यात आले़
आज एकदिवसीय नोंदणी अभियानांतर्गत शहरातील मिनी मॅजिक स्कूल, रिलायन्स पेट्रोलपंपासमोर, मेरी, चाटे रेसिडेन्शिअल कॅम्पस, आडगाव नाका, महात्मा फुले कलादालन, गोविंदनगर, जनता विद्यालय उत्तमनगर, सिडको, श्रीकृष्ण लॉन, काठेगल्ली, राधाकृष्ण मंगल कार्यालय, इंदिरानगर, क्रॉम्प्टन हॉल, सावतानगर, सिडको, वाघ गुरुजी प्राथमिक विद्यालय, गंगापूररोड, इच्छामणी मंगल कार्यालय, उपनगर, डे केअर शाळा, राजीवनगर, छत्रपती शिवाजी हायस्कूल, सातपूर या केंद्रांवर नोंदणी करण्यात आली़ आज उद्घाटन होताच सर्वच केंद्रांवर नोंदणीसाठी विद्यार्थी, तसेच त्यांच्या पालकांनी एकच गर्दी केली होती़
‘लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब’ हा इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषत्वाने सुरू केलेला अॅक्टिव्हिटी क्लब आहे. या मंचाद्वारे बालकांसाठी वैविध्यपूर्ण अशा शैक्षणिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
या मंचासाठी नाव नोंदवल्यावर एक वॉटर बॉटल, ओळखपत्र, ‘यूसीएमएएस’चे सहा दिवसांचे फ्री वर्कशॉप, आय स्क्वेअर आॅप्टिकल्सकडून फ्री आय चेकअप, समीर डान्स इन्स्टिट्यूटकडून सहा दिवसांचे फ्री वर्कशॉप, सिक्स डिग्रीज्कडून फ्री डोनट आॅर योगर्ट, कॅफे क्रेमकडून एक फ्री आइस्क्रीम व झोडिअॅक लर्निंग सिस्टिमकडून आठ तासांचे इंग्लिश स्पिकिंगचे शिबिर असे अनेक उपहार मुलांना लाभणार आहेत. याशिवाय कॅम्पस् क्लबच्या प्रत्येक सदस्याला श्यामराव विठ्ठल को-आॅपरेटिव्ह बॅँकेकडून (एसव्हीसी) झीरो बॅलन्स फ्री सेव्हिंग अकाउंट व सोबतच एक पिगी बॅँकदेखील मोफत मिळणार आहे. याबरोबरच ‘लोकमत टाइम्स’मध्ये रोज एक कूपन प्रसिद्ध केले जाणार आहे. त्या कूपनमधील प्रश्नाचे अचूक उत्तर बलई कोश या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शीटवर बालगोपाळांनी चिकटवायचे आहे.
त्यातील भाग्यवान विजेत्यांना बलई जीनिअस स्कीममध्ये एक लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे सगळे लाभ फक्त १५० रुपयांच्या नावनोंदणीवर मिळणार आहेत. (प्रतिनिधी)