शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ सरपंच अवॉर्डस् : नाशिक जिल्ह्यातील कर्तबगार सरपंचांचा बुधवारी शानदार सोहळ्यात गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 15:59 IST

जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्राम संरक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, ई-प्रशासन (डिजीटल अवॉर्ड), पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती, उद्योन्मूख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या श्रेणीमध्ये सरपंचांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबारकोड पध्दतीने नाशिक जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड या निवडप्रक्रियेअंतर्गत १३ श्रेणीतील कार्यकुशल सरपंचांची निवड प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक व राष्टपती पुरस्कार विजेते भास्करदादा पेरे यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक : गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणा-या व त्या स्वप्नांना मुर्त रुप देण्यासाठी झटणाºया कर्तबगार सरपंचाच्या कार्याची दखल घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डस् चे वितरण उद्या बुधवारी (दि.१७) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात करण्यात येणार आहे.बीकेटी प्रस्तुत तसेच पंतजली प्रायोजित व महिन्द्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक असलेल्या या लोकमत सरपंच अवॉर्डस वितरण सोहळ्यास राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे व पोलीस अधिक्षक संजय दराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये सकाळी अकरा वाजता होणा-या या कर्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक व राष्टपती पुरस्कार विजेते औरंगाबाद जिल्ह्यातील भास्करदादा पेरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्राम संरक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, ई-प्रशासन (डिजीटल अवॉर्ड), पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती, उद्योन्मूख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या श्रेणीमध्ये सरपंचांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.‘लोकमत’ नेहमीच प्रयत्नपूर्वक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्र म राबविण्यात आघाडीवर राहिला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने राज्य विधिमंडळापासून ते देशाचे सर्वोच्च कायदे मंडळ -संसदीय सदस्यांचा गौरव केला आहे. तळागाळातील व्यक्तींच्या आदर्श कार्याला ओळखून लोकशाहीला बळकटी देण्यासाठीच ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ उपक्र म हाती घेण्यात आला आहे. आपले गाव हाच आपला अभिमान आहे आणि इथेच आमची लोकशाही मूल्ये सर्वात महत्त्वाची असली पाहिजेत. जय हिंद!-विजय दर्डा, चेअरमन, संपादकीय मंडळ, लोकमत समूहअसे होते परिक्षक मंडळपरिक्षक मंडळामध्ये माजी मंत्री, वनाधिपती विनायकदादा पाटील, कृषीतज्ज्ञ डॉ. गिरीधर पाटील, वीजमंडळाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता अरविंद गडाख, प्रगती अभियानच्या संचालिका सौ. आश्विनी कुलकर्णी, जलचिंतनचे राजेंद्र जाधव, जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील व पाणी बचाव चळवळीतील निशिकांत पगारे यांचा समावेश होता.बारकोडद्वारे निवडदहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना अवलंबिल्या जाणा-या बारकोड पध्दतीने नाशिक जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण्यात आली. त्यामुळे निवड झालेल्या सरपंचांची व त्यांच्या ग्रामपंचायतींची नावे समोर न येता तटस्थ व पारदर्शकपणे निवड प्रक्रिया पार पडली. या निवडप्रक्रियेअंतर्गत १३ श्रेणीतील कार्यकुशल सरपंचांची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचLokmat Eventलोकमत इव्हेंटNashikनाशिक