‘लोकमत’वर सदिच्छांची बरसात

By Admin | Updated: July 3, 2017 00:19 IST2017-07-03T00:19:26+5:302017-07-03T00:19:56+5:30

मालेगाव : स्नेह अधिक दृढ करण्याचे अभिवचन देत मालेगावकरांनी ‘लोकमत’ च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

'Lokmat' rains on the rainy season | ‘लोकमत’वर सदिच्छांची बरसात

‘लोकमत’वर सदिच्छांची बरसात

लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : वर्षांनुवर्षे जपलेला स्नेह अधिक दृढ करण्याचे अभिवचन देत मालेगावकरांनी ‘लोकमत’ च्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या. निमित्त होते, ‘लोकमत मालेगाव विभागीय कार्यालया’ च्या एकविसाव्या वर्धापन दिनाचे!
येथील लोढा मार्केटमधील ‘हॅप्पी हॉल’ मध्ये आयोजित हा ‘आनंद सोहळा’ उत्तरोत्तर रंगत गेला. वर्धापन दिनाचे औचित्य साधत प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लीडर’ या विशेषांकाची मान्यवरांनी प्रशंसा केली. ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, गजानन राजमाने, मामको बँकेचे संचालक राजेंद्र भोसले, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती अनिल तेजा, जि. प. सदस्य समाधान हिरे, अरुण पाटील, सुवर्णा देसाई, विकी खैरनार, नंदूकाका शिरोळे, कमळाताई मोरे, बापू पवार, प्रभाकर शेवाळे, शांताराम लाठर, बाजार समितीचे संचालक संजय निकम, देवराज गरुड, नगरसेवक ज्योती भोसले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गुलाबराव चव्हाण, नितीन पोफळे, नायब तहसीलदार जगदीश निकम, प्रा. के. एन. अहिरे, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, अ‍ॅड. सुधीर अक्कर, अ‍ॅड. शिशिर हिरे यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार, सहकार, उद्योजक, सखी मंच सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून ‘लोकमत’च्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Web Title: 'Lokmat' rains on the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.