शिंपी टाकळीच्या उपसरपंचपदी लोखंडे
By Admin | Updated: July 26, 2014 00:56 IST2014-07-25T22:32:23+5:302014-07-26T00:56:01+5:30
शिंपी टाकळीच्या उपसरपंचपदी लोखंडे

शिंपी टाकळीच्या उपसरपंचपदी लोखंडे
निफाड : तालुक्यातील शिंपी टाकळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी युवा कार्यकर्ते शिवाजी मधुकर लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपद राखीव असून, या जागेचा कुठलाही सदस्य नसल्याने त्यांच्याकडे सरपंचपदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी शिंपी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी शिवाजी लोखंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना प्रभारी सरपंचपदी घोषित करण्यात आले. यावेळी वाळीबा बोडके, रंजना लोखंडे, सुमन बोडके,उषा सांगळे यांची ग्रामपंचायत सदस्यपदी निवड करण्यात आली. सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करण्याची ग्वाही नवनियुक्त सरपंच लोखंडे यांनी दिली. याप्रसंगी माजी सरपंच बाजीराव बोडके, वसंतराव लोखंडे, बाळासाहेब लोखंडे, दामोदर लोखंडे, खंडू बोडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)