शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 14:02 IST

या डुडलवर क्लिक करताच मतदाराला मतदान, भारतीय निवडणूक आयोगाविषयीची विविध माहिती देणाऱ्या लिंक्स खुल्या होतात. तसेच मतदार जनजागृतीसंबंधित स्थानिक वर्तमानपत्र व वेब न्युज पोर्टलवर झळकलेल्या बातम्याही वाचवयास मिळतात

ठळक मुद्देडुडल अत्यंत लोकप्रिय ठरणार भारतीय लोकसभा निवडणुक या डुडलद्वारे जनतेपर्यंत पोहचणार

नाशिक : देशासह राज्यात लोकसभा निवडणूकीला सुरूवात झाली असून ‘गुगल’ सर्च इंजिनकडून भारत अन् भारताच्या लोकशाहीचा सन्मान ‘डुडल’ने करण्यात आला आहे. गुगलकडून गुरूवारी (दि.११) मतदानाचा आकर्षक डुडल पेजवर झळकविण्यात आला आहे. या डुडलवर एका क्लिकवर मतदारांना मतदान प्रक्रियेविषयीची जागृतीपर माहिती सहजरित्या उपलब्ध होत आहे.

गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून या माध्यमातून दररोज कोट्यवधील ‘नेटीझन्स’ विविध माहिती जाणून घेण्यासाठी याचा उपयोग करतात. या सर्चइंजिनवर येताच डुडलमधील दुसरा ‘ओ’ हा मतदानानंतर बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईच्या आकाराचा बनविण्यात आला आहे. या डुडलवर क्लिक करताच मतदाराला मतदान, भारतीय निवडणूक आयोगाविषयीची विविध माहिती देणाऱ्या लिंक्स खुल्या होतात. तसेच मतदार जनजागृतीसंबंधित स्थानिक वर्तमानपत्र व वेब न्युज पोर्टलवर झळकलेल्या बातम्याही वाचवयास मिळतात. त्यामुळे हा डुडल अत्यंत लोकप्रिय ठरणार असून संपुर्ण देशात नव्हे तर जगभरात भारतीय लोकसभा निवडणुक या डुडलद्वारे जनतेपर्यंत पोहचणार आहे.

मतदान हे प्रत्येक मतदाराचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावण्याची नितांत गरज आहे. दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस भारतीय निवडणूक आयोगाकडून ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जातो, अशा प्रकारच्या प्रबोधनपर माहितीसह मतदानपध्दती, मतदानाचे महत्त्व पटवून देणारी माहितीही यावेळी सहज उपलब्ध होते. डुडलसह इंटरनेटवर #भारत हा ट्रेण्डदेखील पहावयास मिळत आहे. गुगलकडून तयार करण्यात आलेला भारतीय निवडणुकांविषयीचा डुडल हा देशाच्या लोकशाहीचा सन्मान मानला जात आहे.नेटिझन्समंडळीने गुरूवारी सकाळी जेव्हा या सर्च इंजिनवर भेट दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यांना हा आकर्षक डुडल दिसला त्यानंतर नेटकऱ्यांनी या डुडलची इमेज अन् लिंक्स सोशलमिडियावर शेअर करत मतदान करा, देशाला बळकट बनवा असे घोषवाक्यासह व्हायरल केली.

टॅग्स :googleगुगलDoodleडूडलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकVotingमतदान