शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत मतदारांच्या रांगा; जेष्ठ नागरिकांसह तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

By suyog.joshi | Updated: May 20, 2024 12:48 IST

नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरूवात झाली.

सिडको,नाशिक (नरेंद्र दण्डगव्हाळ)  : नाशिक लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सुरूवात झाली. सकाळपासूनच गणेश चौक तसेच मारवाडी हायस्कूल होते मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदार हे स्वयंस्फूर्तीने मतदान करताना दिसून आले. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. 

उन्हाचा तडाखा अधिक असल्याने सकाळीच अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांकडे असलेला मोबाईल घेऊन जाण्यास पोलिसांनी मज्जाव केलाने अनेक मतदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तर काही मतदारांनी मोबाईल आतमध्ये घेऊन दिला नसल्याने मतदान न करताच माघारी फिरणे पसंत केले मोबाईल कोणाकडे द्यावा असा प्रश्न उपस्थित करत अनेक मतदाराने मतदान न करताच घरी जाणे पसंत केले. विशेष म्हणजे प्रत्येक मतदार केंद्रावर ठेवण्यात आलेले पोलीस हे पर राज्यातील असल्याने ते कोणालाही आत मध्ये सुरत नव्हते याचा फटका राजकीय पुढे यांना देखील बसला.

सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर 7:45 वाजेच्या सुमारास मोरवाडी येथील हायस्कूलमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडले होते. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, मतदान केंद्रवर असलेले अधिकाऱ्यांनी ते मशीन बदलून त्या जागी  तात्काळ नवीन मशीन बसवले यानंतर पुन्हा मतदान सुरळीत झाले.

प्रत्येक वेळी मतदान होताना अनेकांची नावे गायब होत असल्याचे प्रकार यंदाच्या निवडणुकीतही दिसून आले. काही मतदारांची नावे गायब झालेले होती, तर काही मतदारांना त्यांचा मूळ ठिकाणी मतदार असताना दुसरीकडे लांब मतदार यादी त्यांचे नाव टाकण्यात आलेले. त्याबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी मतदान सुरू असताना गणेश चौक मनपा शाळा  राहुल गरुड या अपंग महिलेने तर नंदू जाधव या  दिव्यांग बांधवाने मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :Nashikनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४