लोहोणेरला दहा दिवसात ७८ बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:55 IST2021-04-07T21:19:09+5:302021-04-08T00:55:13+5:30

लोहोणेर : नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याने गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. दहा दिवसात कोरोना बाधितांचा आकडा ७८ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Lohoner recorded 78 victims in ten days | लोहोणेरला दहा दिवसात ७८ बाधितांची नोंद

लोहोणेरला दहा दिवसात ७८ बाधितांची नोंद

ठळक मुद्देविना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोहोणेर : नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याने गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. दहा दिवसात कोरोना बाधितांचा आकडा ७८ वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

लोहोणेर परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. बेफिकीरपणे वागणाऱ्या नागरिकांमुळेच संसर्गात वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लावण्याची मागणी होऊ लागली आहे. गेल्या दहा दिवसात लोहोणेर गावात ६७ व वसाका येथील ११ अशा ७८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

शासकीय आदेशानुसार सायंकाळी सात वाजेपर्यत काही व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश असतांनासुद्धा एक तास उशिरा म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंत येथील काही दुकाने बिनबोभाटपणे सुरु असतात. कोरोनाची लांबत झालेली साखळी खंडित करण्यासाठी गावातील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद करायला हवेत तसेच मास्क न वापरणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Lohoner recorded 78 victims in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.