धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप
By Admin | Updated: July 12, 2016 23:15 IST2016-07-12T23:13:48+5:302016-07-12T23:15:27+5:30
धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप

धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप
घोटी : डॉक्टरांअभावी रु ग्णांची हेळसांडघोटी : इगतपुरी तालुक्यातील धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली काही दिवसांपासून एकही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याने रात्रीच्या वेळी उपचारार्थ या केंद्रात येणाऱ्या रुग्णांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने श्रमजीवी संघटनेच्या संतप्त कार्यकत्यांनी रविवारी रात्री आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आपला निषेध व्यक्त केला.
तालुक्यातील वैतरणा परिसरात असलेल्या धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक गावांतून रुग्ण उपचारासाठी येत असतात. रविवारी रात्री श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांच्यासह कार्यकत्यांनी आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली असता दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत रुग्ण आरोग्य केंद्राबाहेर पावसात ताटकळत उभे असलेले दिसून आले. शिपाईच रुग्णांवर उपचार करीत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. याबाबत श्रमजीवी संघटनेने तत्काळ पावले उचलत आरोग्य केंद्रास कुलूप लावून आपला निषेध व्यक्त केला. (वार्ताहर)