गोळीबारातील संशयित लोखंडेला कोठडी
By Admin | Updated: October 24, 2014 01:05 IST2014-10-23T00:13:17+5:302014-10-24T01:05:33+5:30
गोळीबारातील संशयित लोखंडेला कोठडी

गोळीबारातील संशयित लोखंडेला कोठडी
नाशिक : जमिनीच्या वादातून गोळीबार करणाऱ्या रुंजा लक्ष्मण लोखंडे यास न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास लोखंडेने तिडके कॉलनी परिसरात हवेत गोळीबार केला होता़ नाशिकरोड परिसरातील रुंजा लोखंडे (ऱा.जेलरोड) व कांतीलाल चोपडा (रा़ नाशिकरोड) यांच्यामध्ये जमिनीवरून वाद होता़ यामुळे संतापलेले लोखंडे हे चोपडा यांच्या घरी गेले व तेथे दरवाजाची बेल वाजवून रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली़ यामध्ये चोपडा यांच्या सासूबाई शोभना मुनोत (६७, श्रेयस अपार्टमेंट, तिडके कॉलनी) या थोडक्यात वाचल्या़
दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी रुंजा लोखंडे यास अटक केली़ त्यास न्यायालयात हजर केले असता २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ (प्रतिनिधी)