तळवाडे येथील उर्दू शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By Admin | Updated: September 3, 2014 00:37 IST2014-09-03T00:37:52+5:302014-09-03T00:37:52+5:30

तळवाडे येथील उर्दू शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

Locked by the villagers in the Urdu school in Talwade, | तळवाडे येथील उर्दू शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

तळवाडे येथील उर्दू शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप




येवला : पहिली ते आठवीचे वर्ग असतानाही तळवाडे येथे केवळ दोनच शिक्षक येथील उर्दू शाळेवर कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे येथील ग्रामस्थांनी तळवाडे उर्दू शाळेला थेट कुलूपच ठोकले
जमील पटेल, सरवर पटेल, शकील पटेल, सलमान पटेल यांच्यासह १०० तळवाडे ग्रामस्थांनी येवला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी किसन चौधरी यांना निवेदन दिले. पहिली ते आठवीचे वर्ग असलेल्या तळवाडे येथील उर्दू शाळेत सहा शिक्षक होते. यापैकी तिघांची समायोजनाच्या नावाखाली बदली झाली. उर्वरित तीन शिक्षकांपैकी जिल्हा बदल म्हणून सोमवारी एकाला बदली आदेश दिला. यामुळे तळवाडे शाळेवर केवळ एक मुख्याध्यापक व एक सहशिक्षक असे दोघेजण कर्तव्यावर आहे. वर्ग १ ते ८ पण शिक्षक केवळ दोनच यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी शाळेला कुलूपच ठोकले.

Web Title: Locked by the villagers in the Urdu school in Talwade,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.