जातेगावच्या शाळेला अध्यक्षांनीच ठोकले कुलूप
By Admin | Updated: July 15, 2014 00:50 IST2014-07-14T22:32:13+5:302014-07-15T00:50:18+5:30
जातेगावच्या शाळेला अध्यक्षांनीच ठोकले कुलूप

जातेगावच्या शाळेला अध्यक्षांनीच ठोकले कुलूप
नांदगाव : बारा शिक्षकांच्या जागेवर तीनच शिक्षक उरल्याने जातेगावच्या संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस कुलूप ठोकल्याची घटना घडली.
शाळेत पहिली ते चौथीपर्यंत ४५० विद्यार्थी पटसंख्येवर आहेत. प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या आहेत. एकूण चार शिक्षकांमध्ये कशीबशी सदर शाळा चालवली जात होती. परंतु चारपैकी एक शिक्षक दीर्घकालीन रजेवर गेल्याने सध्या शाळेत तीनच शिक्षक उरले आहेत.
प्रशासनाचेदेखील दुर्लक्ष झाले असल्याने नाइलाजाने शाळेस कुलूप लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती सदर शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष संतोष बोराडे यांनी दिली. सरपंच अर्जुन निकम व कैलास पवार, अनिल पवार, अशोक लाठे, बाळू लाठे आदि शाळेत याप्रसंगी उपस्थित होते.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिक्षकांच्या ११ जागा मंजूर आहेत. परंतु वरिष्ठ स्तरावरून शिक्षक पाठविण्यात आलेले नाहीत. नवीन शिक्षण सेवकांची जिल्हास्तरावर भरती झाली असून, लवकरच ते मिळण्याची आशा आहे. मात्र शिक्षक मिळण्याचा कालावधी किती? याबाबत भालेराव यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. (वार्ताहर)
’ नाशिक : शहरात पाणीटंचाई-सदृश परिस्थिती निर्माण झाली असतानाही इंदिरानगर परिसरात
गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा बेसुमार अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.