मुक्या प्राण्यांनाही लॉकडाउनचे चटके !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:42 IST2020-03-30T22:38:30+5:302020-03-30T22:42:42+5:30
त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्व देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्याचा फटका परिसरातील मुक्या प्राण्यांनाही बसू लागला आहे.

मुक्या प्राण्यांनाही लॉकडाउनचे चटके !
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्व देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्याचा फटका परिसरातील मुक्या प्राण्यांनाही बसू लागला आहे.
वाहतूक ठप्प असल्याने सतत भाविकांचा राबता असलेले श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर भाविकांअभावी सुने सुने झाले आहे. यात्रेकरूंनाच दर्शन बंद केल्यामुळे व लॉकडाउन केल्यामुळे पशु-पक्ष्यांचं जीवनही काही अंशी त्यावरच अवलंबून आहे. मंदिर परिसरात येणारे अनेक भाविक पुण्य मिळण्यासाठी गाई-गुरांना चारा घालतात. त्यामुळे अनेक जनावरांचे पोट भरते. आता लॉकडाउनच्या काळात जनावरांची जबाबदारी घेण्यास काय हरकत आहे. दरम्यान, चहाच्या दुकानावर चहा पिताना अनेक भाविक तेथे असणाऱ्या मोकाट कुत्र्यांना पाव बिस्कीटे खाऊ घालतात. तसेच गंगाद्वार, ब्रह्मगिरी पर्वतावर जाणारे भाविक डोंगरावरील माकडांना चणे फुटाणे, केळी व इतर पदार्थ खाण्यासाठी घेऊन जात असतात, मात्र रोजची सवय असणाºया पशु-पक्ष्यांचे हाल होत आहेत. येथील देवीदास देशपांडे, छाया पटेल, सुजाता खोडे, शकुंतला खोडे, शीतल नाथ आदी रोज चणे फुटाणे, कुरमुरे, केळी असे पदार्थ व पाण्याच्या बाटल्या घेत बºयाच पायºया चढून वर जातात. आवाज दिल्यावर अनेक माकडं त्यांच्याजवळ येतात. व आणलेले खाद्य व पिण्याचे पाणी ते माकडांना देतात. मोकाट गुरांसाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांनी चारा-पाण्याची सोय करावी अशी मागणी वाढत आहे. किराणा दुकानदार भटक्या कुत्र्यांना बिस्कीटे टाकतात. कुशावर्त चौकातील किराणा व्यावसायिक मनोज करपे हे कुत्र्यांना बिस्कीट पुडे टाकून त्यांची भूक भागवितात. तर काही तरु ण मंडळी डोंगरावरील माकडांना काही खायला नेतात, तसेच ब्रह्मगिरीवर लिंबू सरबत, प्रसाद विकणारे काही व्यावसायिक येथील माकडांची विशेष काळजी घेतात.