शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन, संचारबंदीमुळे वाढते आहे. नैराश्य: मानसोपचारतज्ज्ञ हेमंत सोननीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 13:49 IST

नाशिक- सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्याच बरोबर संचारबंदी देखील लागु आहे. शासन युध्दपातळीवर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींमुळे नागरीकांमध्ये नैराश्येचे प्रमाण वाढु लागले असल्याची माहिती नाशिकचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली.

ठळक मुद्देसमुपदेशन महत्वाचेकुटूंबासमवेत चांगला वेळ घालवा

नाशिक- सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्याच बरोबर संचारबंदी देखील लागु आहे. शासन युध्दपातळीवर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींमुळे नागरीकांमध्ये नैराश्येचे प्रमाण वाढु लागले असल्याची माहिती नाशिकचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली. इंडियन मेडीकल असोसिएशनचे नियोजीत अध्यक्ष असलेल्या डॉ. सोननीस यांनी सद्य स्थितीवर नागरीकांच्या असलेल्या मानसिकतेबाबत लोकमतला माहिती दिली.

प्रश्न: देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी त्यामुळे नागरीक चिंतेत आहेत. त्यातच अनेकांना लॉकडाऊन नंतरच्या बंदीची भीती वाटत आहे. त्याबाबत काय स्थिती आहे?डॉ. सोननीस: कोरोनाच्या जागतिक संकटामुळे भीषण स्थिती निर्र्माण झाली आहे. विशेषत: लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे तर नागरीक धास्तावले आहेत. याशिवाय आपल्या भागात आणि अन्यत्रही कोरोना बाधीतांची माहिती मिळाल्यानंतर नागरीक पॅनीक होत आहेत. अनेकांना भविष्याची चिंता सतावते आहे. त्यातून नैराश्य वाढु लागल्याचे दिसत आहे. यासंदर्भात अनेक नागरीकांचे मानसोपचार तज्ज्ञांकडे फोन येत आहेत. त्यांचे समुपदेशन आम्ही करत आहोत. याशिवाय अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी बºया केलेल्या रूग्णांच्या मनस्थितीवर देखील या सर्व परिस्थतीचा परीणाम होत आहे. त्यामुळे त्यांचे देखील आता फोन येऊ लागले आहेत.

प्रश्न: राज्यभरात अशाप्रकारे स्थिी असेल तर काय करावे?

डॉ. सोननीस: सध्या सर्वत्र मानसिक स्थिती अशी जाणवते. त्यामुळे राज्यस्तरावर मानसोपचार संघटनेच्या वतीने नागरीकांच्या समुपदेशनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. काही तज्ज्ञांचे नंबर आम्ही जाहिर केले असून त्यावर येणाºया नागरीकांच्या फोनवर समर्पक समुपदेशन केले जाते.

प्रश्न: एरवी कुटूंबासोबत वेळ देता येत नाही असे सांगणारे अनेक नागरीक आता मात्र वेळ कसा घालवावा याबाबत प्रश्न करताना दिसतात.डॉ. सोननीस: हे खरे आहे. मात्र आता कुटूंबासाठी वेळ देताना आणखी दिवसभरात काय करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो. त्यामुळे अनेक जण टाईमपास करतात. वेळ घालवण्यासाठी वॉटस अ‍ॅप किंवा फेसबुक तास न तास बघितला म्हणजे वेळ सत्कारणी लागत नाही. त्यातून काही साध्य होत नाही. त्यासाठी ग् ाुणवत्तेपूर्ण वेळ घालवला पाहिेजे.म्हणजे ब-याच गोष्टी आपल्याला दैनंदिन धावपळीमुळे करता येत नाही. अशा गोष्टी केल्या पाहिजेत. युट्यूब वरून काही चांगले व्यायामाचे व्हीडीओ बघून व्यायाम करायचा असेल तर तेही केले पाहिजे. काहींना गाण्याची आवड असते परंतु वेळ मिळत नाही. त्यामुळे गाणे शिकून एखादा व्हीडीओ तयार करून तो युट्यूब वर टाकता येऊ शकतो. शिकण्यासारख्या किंवा करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात त्या या कालावधीत करता येऊ शकतात. आपले अनेक नातेवाईक ज्या चांगल्या गोष्टी करीत असतील त्या आपण आपल्या घरात करू शकतो. त्यामुळे वेळ घालवा परंतु तो टाईम पास असता कामा नये तर त्यातून काही तरी सकारात्मक निघाले पाहीजे म्हणजे गुणवत्तापुर्ण वेळ घालवला पाहिजे.

मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याMental Health Tipsमानसिक आरोग्य