जूननंतरच्या थकीत कर्जदारांनाही ‘कर्जमाफी’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:49 IST2017-10-06T00:48:44+5:302017-10-06T00:49:02+5:30
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत २०१६ मध्ये कर्ज घेतलेले व त्याची २०१७ मध्ये फेड केलेले किंवा न केलेल्या शेतकºयांचाही समावेश करण्यात आला आहे. अशा शेतकºयांचे बॅँक खाते क्र मांक व आधार कार्ड क्र मांक जमा करावा, असे आदेश सहकार विभागाच्या विशेष लेखा परीक्षकांनी काढले आहेत.

जूननंतरच्या थकीत कर्जदारांनाही ‘कर्जमाफी’?
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत २०१६ मध्ये कर्ज घेतलेले व त्याची २०१७ मध्ये फेड केलेले किंवा न केलेल्या शेतकºयांचाही समावेश करण्यात आला आहे. अशा शेतकºयांचे बॅँक खाते क्र मांक व आधार कार्ड क्र मांक जमा करावा, असे आदेश सहकार विभागाच्या विशेष लेखा परीक्षकांनी काढले आहेत. या निर्णयामुळे जून २०१७ मध्ये थकबाकीदार ठरलेल्या शेतकºयांनाही कर्जमाफी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जून महिन्यात राज्यातील शेतकºयांनी संप पुकारल्यामुळे सरकारने शेतकºयांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. त्यानंतर २८ जूनला सरकारने या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून, आधी जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना अटीशर्तींसह दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केल्याचे जाहीर केले. सरकारने काही अटीशर्ती निश्चत करूनही १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्णात २ लाख ५६ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरून त्याची प्रत संबंधित बॅँक किंवा विकास संस्थांकडे जमा केली आहे. संबंधित बॅँकांनी या माहितीची आॅनलाइन तपासणी करून घेऊन आता ती माहिती राज्य सरकारने दिलेल्या पोर्टलवर भरण्याचे काम सुरू आहे. या पत्रामध्ये जून २०१७ मधील थकबाकीदार व नियमित कर्जदारांचा समावेश कर्जमाफी योजनेत झाला असल्याचा उल्लेख आहे. यामुळे सरकारने निकष बदलून सर्वांनाच कर्जमाफी दिली की काय, अशी चर्चा सुरू आहे.