बनावट दागिने देऊन घेतले सव्वातीन लाखांचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:21+5:302021-01-13T04:36:21+5:30
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरेश बाबुलाल शाह (रा.गंजमाळ) यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार ५ मे, २०२० रोजी ...

बनावट दागिने देऊन घेतले सव्वातीन लाखांचे कर्ज
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरेश बाबुलाल शाह (रा.गंजमाळ) यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार ५ मे, २०२० रोजी संशयित अंकुश याने सहा अंगठ्या, एक पाटली, एक ब्रेसलेट, एक नेकलेस, दोन वेल, एक चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागिने गहाण ठेवत फिर्यादी शाह यांच्याकडून ३ लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले. काही दिवसानंतर फिर्यादी शाह यांनी संशयिताकडे मुद्दल व व्याजाची मागणी केली असता, त्याने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी शाह यांनी २५ जुलै, २०२० ते दागिने विक्रीसाठी सराफाकडे नेले असता, दागिने बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, शाह यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला. मात्र, त्यानुसार तेथे अदाखलपात्र गुन्हा नोंदविला गेल्याने शाह यांनी न्यायालयात अर्ज दिला. त्यामुळे न्यायालयाने आदेशित केल्यानंतर सोमवारी (दि. ११) संशयित अंकुशविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.