शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या अमिषाने नायब तहसिलदाराची आर्थिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 07:02 IST

पैसे भरल्यानंतर याच कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावरून आनंद कुमार व एका महिलेने कर्ज मंजूर झाल्याचे सांगून तसा ईमेल कुलकर्णी यांना पाठविला़.

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबक येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार उदय गो़ कुलकर्णी (१०, अमेया अपार्टमेंट, गायकवाड मळा, नाशिकरोड) यांची कर्जाच्या अमिषाने ऑनलाईन पद्धतीने ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कुलकर्णी यांनी तक्रार केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलकर्णी यांनी एका दैनिकात आलेली कर्जाविषयी जाहिरात वाचली. या जाहिरातीनुसार कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी मोबाईल क्रमांक (८८२८६०६९१८) वर संपर्क केला. या मोबाईलवरील वैशाली मोरे या महिलेने कागदपत्रे व बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत ‘वनकॅपिटल@आऊटलूक डॉट कॉम’ या वेबसाईटवर पाठविण्यास सांगून कर्जासाठी प्रथम दोन हजार ७५० रुपये पंजाब नॅशनल बँकेच्या कल्याण (प़)शाखेत राजेंद्र गायकवाड या व्यक्तीच्या नावावर भरण्यास व पावती मेल करण्यास सांगितले. त्यानुसार पैसे भरल्यानंतर याच कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावरून आनंद कुमार व एका महिलेने कर्ज मंजूर झाल्याचे सांगून तसा ईमेल कुलकर्णी यांना पाठविला.  या मेलवर स्वाक्षरी करून तो मेल पुन्हा पहिल्या ईमेल अकाऊंटवर पाठविण्यास सांगितले़ तसेच कर्जाच्या दोन हप्त्याची रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या त्याच खात्यात २१ हजार २०० व आठ हजार दोनशे असे भरण्यास सांगितले. त्यानुसार १४ व १५ मे रोजी कुलकर्णी यांनी ही रक्कम संबंधित गायकवाड नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा केली.  विशेष म्हणजे ही रक्कम भरत नाही तोपर्यंत कुलकर्णी यांना मोबाईलवर फोन सुरू होते.कुलकर्णी यांनी बँकेत पैसे भरल्यानंतर कर्जाच्या रकमेसाठी संबंधित मोबाईल नंबरवर फोन केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शंका आल्याने त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन ३२ हजार १०० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीNashikनाशिक