शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एलएलबी पुनर्परीक्षा प्रवेशपत्रांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:13 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिकमधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र त्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली असून, परीक्षा देता न आल्यास त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे२४ आॅक्टोबरपासून परीक्षा : १५ विद्यार्थ्यांची अडचण

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिकमधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र त्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली असून, परीक्षा देता न आल्यास त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखा पदवी अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी २०१४ च्या जुन्या अभ्यासक्रमानुसार आॅक्टोबर २०१८ मध्ये पुनर्परीक्षा देत आहेत. त्यांना परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र महाविद्यालयातून प्राप्त करणे अनिवार्य आहे. परंतु नाशिकमधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातून एलएलबी द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा देणाऱ्या २०५ विद्यार्थ्यांपैकी ५७ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाकडून महाविद्यालयाला प्राप्त झालेले नसल्याने विद्यार्थ्यांनाही ते मिळू शकलेले नाही. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाक डून महाविद्यालयांच्या मेल आयडीवर पाठविले जातात. या प्रवेशपत्रांचे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. परंतु महाविद्यालयाला विद्यापीठाकडूनच ओळखपत्र पाप्त झाले नसल्यामुळे महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर जवळपास ४२ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाकडून पाठविण्यात आले. मात्र त्यानंतरही १५ विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळण्याची प्रतीक्षा कायम असून, या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राअभावी परीक्षा देता आली नाही, तर त्यांचे वर्ष पुन्हा एकदा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.विद्यार्थी संघटना आक्रमकविद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विधी शाखेच्या द्वितीय वर्ष पदवी पुनर्परीक्षेच्या प्रवेशपत्रांचा घोळ घातल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत असतानाही अद्याप विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांचा घोळ मिटलेला नाही. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाचे अधिकारी योगेश सोनार यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण