शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

राहत्या घरात पतीने पत्नीला जाळून ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:36 IST

प्रकल्पाच्या ठेकेदाराने भिवंडी येथून या कुटुंबियाला वॉचमन म्हणून कामावर ठेवले होते. दरम्यान, एका वाटसरूने मंगळवारी रात्री ध्रुवनगर परिसरात वॉचमनच्या खोलीला आग लागल्याची माहिती गंगापूर पोलिसांना कळविली.

ठळक मुद्दे पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून खून केला संशयित समशेर काही प्रमाणात भाजल्याने त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू

नाशिक : गंगापूररोडवरील ध्रुवनगर परिसरात एका गृहप्रकल्पाच्या साईटवर देखरेखीसाठी असलेल्या परप्रांतीय शाह दाम्पत्य राहत होते. संशयित पती समशेर अबलोश शाह याने पत्नी आयशा खातून शाह हिला ज्वलनशिल पदार्थ टाकवून मध्यरात्री पेटवून दिले. आगीमध्ये शंभर टक्के भाजल्याने आयशाचा मृत्यू झाला तर संशयित तिचा पती अबलोशदेखील भाजला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ध्रुवनगर परिसरातील मराठी शाळेजवळील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पावर वॉचमन म्हणून सदनिकेत राहणाऱ्या शाह कुटुंबिय मुळ बिहार राज्यातील आहे. अबलोश व आयशा या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वादविवाद झाले. मंगळवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास अबलोश याने पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून खून केला. दरम्यान, आगीची झळ बसल्याने संशयित समशेर काही प्रमाणात भाजल्याने त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे. गृहप्रकल्पाच्या ठेकेदाराने भिवंडी येथून या कुटुंबियाला वॉचमन म्हणून कामावर ठेवले होते. दरम्यान, एका वाटसरूने मंगळवारी रात्री ध्रुवनगर परिसरात वॉचमनच्या खोलीला आग लागल्याची माहिती गंगापूर पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असता त्यांनी तत्काळ विजेरीच्या प्रकाशात खोलीत जाण्याच प्रयत्न केला असता प्रचंड धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी अबलोश याची पत्नी आयशा पुर्णपणे भाजून मृत्यूमुखी पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी समशेर हा खोलीमध्ये आगीच्या ज्वालांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी इतरत्र पळत होता. पोलिसांनी तत्काळ त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढून ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केला असता कुठल्याही प्रकारची आग घरामध्ये लागलेली नव्हती तर मयत आयशाचा पती संशयित समशेर याने ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने पत्नीला जाळून ठार मारल्याचे उघहकीस आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दत्तात्रय लहानू माळी (५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित अबलोशविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक मोरे करीत आहेत.

टॅग्स :Murderखूनnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय