ंमीराबार्इंचे जगणे म्हणजे भक्तीचा वस्तुपाठ
By Admin | Updated: August 26, 2016 22:19 IST2016-08-26T22:18:31+5:302016-08-26T22:19:04+5:30
विवेक घळसासी : सटाण्यात दादासाहेब पाटील ट्रस्टतर्फे व्याख्यानमाला

ंमीराबार्इंचे जगणे म्हणजे भक्तीचा वस्तुपाठ
सटाणा : दातृत्व गुण हा महिलांमध्ये नैसर्गिक व उपजतच असतो. शिवाय त्याला निष्ठेची आणि समर्पणाचीही जोड मिळून जाते. म्हणून भक्तीत महिला अग्रस्थानी असतात. यामुळेच मीराबार्इंचे जगणे म्हणजे भक्तीचा अत्युच्च वस्तुपाठ ठरतो, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.
येथील दादासाहेब तथा वसंतराव दगाजी पाटील ट्रस्टतर्फे दादासाहेबांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘कृष्णवेडी मीरा’ याविषयी बोलताना घळसासी यांनी खऱ्या भक्तीचा मार्ग दाखविला. देशभक्ती आणि देवभक्ती यात अंतर नाही. कृष्ण व्यक्ती नसून एक तत्त्व आहे. कृष्णाजवळ जाऊन कृष्णच होऊन जाणे यालाच भक्ती म्हणतात, तर अद्वैताचा अनुभव घेणारे तत्त्वज्ञान म्हणजे मीराबाई होय, असेही ते म्हणाले.
आजच्या राजकारण्यांनीसुद्धा निष्ठा आणि समर्पण या गुणांचा अवलंब करण्याची गरज असून, तसे झाल्यास राजकारणाला समाजकारणाची जोड मिळून सगळ्यांचाच उत्कर्ष होईल, असे मतही त्यांनी मांडले.
दरम्यान, दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ट्रस्टचे संस्थापक व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक करताना उपक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट सांगून त्याकरिता गेल्या दशकापासून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ऋ ण व्यक्त केले.
यावेळी प्राचार्य हितेंद्र अहेर, प्रा. बी. डी. बोरसे, प्रल्हाद पाटील, प्रभाकर पाटील, श्यामकांत मराठे, समीर पाटील, प्रा. अनिल पाटील, आर. डी. देवरे, सुनील मोरे, पी. टी. गुंजाळ, डॉ. विजया पाटील, प्रा. शांताराम गुंजाळ, तुषार महाजन, जगदीश कुलकर्णी आदिंसह साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेतकर यांनी केले. (वार्ताहर)