ईदनिमित्त जनावरांचे बाजार बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:42 IST2020-07-28T21:58:19+5:302020-07-29T00:42:58+5:30
मालेगाव : बकरी ईदनिमित्त जनावरांचे बाजार बंद राहणार असून, नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास आॅनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत, असे शासनाने आदेश दिले आहेत.

ईदनिमित्त जनावरांचे बाजार बंद राहणार
ठळक मुद्दे शुक्रवारचा आठवडे बाजार भरणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : बकरी ईदनिमित्त जनावरांचे बाजार बंद राहणार असून, नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास आॅनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून खरेदी करावीत, असे शासनाने आदेश दिले आहेत.
ईदनिमित्त भरणारा गुरांचा आठवडे बाजार कोविड या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये या करणामुळे शुक्रवारचा आठवडे बाजार भरणार नाही. शेतकऱ्यांनी आपली जनावरे आठवडे बाजारात विक्रीसाठी आणू नये. आठवडे बाजारात होणारे गुरांचे खरेदी - विक्री व्यवहार बंद राहणार असल्याचे बाजार समितीने कळविले आहे.