सटाणा तहसीलवर पशुधन पदविकाधारकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:42+5:302021-07-28T04:15:42+5:30
सटाणा : पशुधन पदविकाधारकांना ग्रामीण भागामध्ये गुरांवर उपचार करण्याची परवानगी देण्यासह अन्य मागण्यांसाठी पदविकाधारकांनी मंगळवारी (दि.२७) येथील तहसील कार्यालयावर ...

सटाणा तहसीलवर पशुधन पदविकाधारकांचा मोर्चा
सटाणा : पशुधन पदविकाधारकांना ग्रामीण भागामध्ये गुरांवर उपचार करण्याची परवानगी देण्यासह अन्य मागण्यांसाठी पदविकाधारकांनी मंगळवारी (दि.२७) येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व पशुधन पदविकाधारक संघटनेचे प्रमुख कपिल अहिरे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा यांनी केले.
ग्रामीण भागामध्ये पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या पशुसेवकांवर बंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाला देण्यात आला. या प्रस्तावामुळे जिल्हाधिकारी व तहसील कार्यक्षेत्रातील पशुसेवकांना शोधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या या भूमिकेमुळे पशुधन पदविकाधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतप्त पदविकाधारकांनी मंगळवारी शहरातील शिवतीर्थापासून ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार नानासाहेब बहिरम यांना सादर करण्यात आले. मोर्चात कपिल अहिरे यांच्यासह हर्षल पवार, अनिल निकुंभ, संजय निकुंभ, दिनेश पाटील, कमलेश पगार, राहुल भामरे, रवींद्र पवार, संजय बागुल, ऋतिक जगताप, प्रशांत देवरे, स्वप्निल अहिरे, प्रशांत अहिरे, समीर सोनवणे, कुणाल शिंदे, ज्ञानेश्वर पाकळे, अमोल चौधरी या पदविकाधारकांसह शर्मा, सुधाकर पाटील आदी सहभागी झाले होते.
-------------
पशुधन पदविकाधारकांनी गुरांवर उपचार करण्यास शासनाने परवानगी द्यावी, या मागणीसाठी सटाणा येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी पदविकाधारक. (२७ सटाणा १)
270721\27nsk_46_27072021_13.jpg
२७ सटाणा १