शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पुरात वाहून जाणाऱ्या वृद्धाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 22:34 IST

पंचवटी ; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय पुरात वाहत जाणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्धाला रविवारी (दि.२३) आला़ देवानंददास नामक वृद्ध गाडगे महाराज पुलाखालून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात वाहत चालले होते़ हा प्रकार पाहून पंचवटीतील आप्पा शिंदे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या वृद्धाला पाण्यातून बाहेर काढून जीवदान दिले. या वृद्धावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी आप्पा शिंदे हे रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिंदे मळा कमानीजवळ उभे होते़ त्यावेळी पुराच्या पाण्यात भगवे कपडे परिधान केलेला वृद्ध पाण्यात वाहत असल्याचे दिसून आले. त्यावेळी शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उडी घेऊन बुडणाऱ्या वृद्धाला अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले. यानंतर १०८ अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी फोन केला, मात्र अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत न आल्याने रिक्षाद्वारे या वृद्धास प्रथम डॉ़जाकीर हुसेन रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ वृद्धाची प्रकृती स्थिर असून, स्वत:चा जीव धोक्यात घालून सदर वृद्धाला वाचविणारे पंचवटीतील आप्पा शिंदे यांचे कौतुक केले जात आहे़