नदीपात्रात अडकलेल्या महिलेला जीवदान

By Admin | Updated: July 14, 2016 01:04 IST2016-07-14T01:01:51+5:302016-07-14T01:04:09+5:30

नदीपात्रात अडकलेल्या महिलेला जीवदान

Lived in a river bed | नदीपात्रात अडकलेल्या महिलेला जीवदान

नदीपात्रात अडकलेल्या महिलेला जीवदान

 पंचवटी : होळकर पुलाखालील चक्रधर स्वामी मंदिराजवळील नदीपात्रात मध्यरात्रीच्या सुमाराला उडी मारल्यानंतर पाण्याच्या मोरीत (छोट्या पुलाखाली) अडकून पडलेल्या एका ३२ वर्षीय महिलेला पंचवटी अग्निशामक दल व पंचवटी पोलिसांनी पाण्याबाहेर जिवंत काढून जीवदान दिले आहे. सदर महिलेने आत्महत्त्या करण्यासाठी पाण्यात उडी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंचवटी परिसरात राहणाऱ्या ऐश्वर्या परदेशी या ३२ वर्षीय महिलेने नदीपात्रात उडी घेतली. पाण्याच्या प्रवाहाने ती महिला एका मोरीत अडकली त्यानंतर तिने आरडाओरड केला; मात्र रात्रीची वेळ असल्याने त्या महिलेला कोणतीही मदत मिळाली नाही. पहाटेच्या सुमाराला एक महिला पाण्याच्या मोरीत अडकलेली असल्याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती कळविण्यात आली. त्यानंतर पंचवटी अग्निशामक दलाचे जवान व पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात उतरून त्या महिलेला पाण्याबाहेर काढून जीवदान दिले.

Web Title: Lived in a river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.