दुचाकीस्वारांकडून पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:25 IST2020-12-03T04:25:33+5:302020-12-03T04:25:33+5:30

येवला : तालुक्यातील मुखेड फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीस्वाराकडून गावठी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त केले आहे. ...

Live cartridges with pistols seized from two-wheelers | दुचाकीस्वारांकडून पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

दुचाकीस्वारांकडून पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

येवला : तालुक्यातील मुखेड फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीस्वाराकडून गावठी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त केले आहे. गुप्त बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. ३०) मुखेड फाटा येथे विंचूर रोडवरील मोरया हॉटेलसमोर संशयित दुचाकीस्वार विकास वाळुबा सोनवणे (१९, रा. साई कॉर्नर,कोपरगाव) तर सोमनाथ कोंडाजी जाधव (२७, रा. जऊळके, ता. येवला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूससह स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच ४१ यू ७२१४) असा ५५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नाशिक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुमार सोने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नंदू काळे, सागर काकड, कुणाल मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी तालुका पोलिसात संशयित सोनवणे, जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

(फोटो ०१ येवला ४)

===Photopath===

011220\01nsk_41_01122020_13.jpg

===Caption===

दुचाकीस्वारांकडून पिस्तुलासह जिवंत काडतुस जप्त

Web Title: Live cartridges with pistols seized from two-wheelers