शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नाशिककरांनो, सावध ऐका, पुढल्या हाका...!

By admin | Updated: September 17, 2015 00:02 IST

पिण्याच्या पाण्याचा मुक्त वापर, बेफिकिरीमुळे टंचाईचे संकट होणार गडद

नाशिक : पावसाने दिलेली ओढ, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६४ टक्के पाणीसाठा, सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीने पाणीपुरवठ्यावर येणारा ताण, शाहीस्नानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाणीसाठ्यातून आतापर्यंत झालेला २४३ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग आणि दैनंदिन सुमारे २८ ते ३० टक्के पाणीगळती, या साऱ्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या नाशिककरांना भविष्यातील पाणीसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पाणीवापराबाबत अजूनही नाशिककर बेफिकीर असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. ‘शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरी’ या मानसिकतेत गुरफटलेल्या नाशिककरांनी पुढल्या संकटाच्या हाका सावध होऊन ऐकल्या नाहीत तर पाणीटंचाईचे ढग गडद होत जातील आणि एकवेळ पाणीकपातीची चाललेली तयारी कदाचित दिवसाआडही होऊ शकते.नाशिक शहर आणि पाणीटंचाई, अशी परिस्थिती अपवादानेच उद्भवली असणार. ‘आम्ही नाशिककर पाण्याबाबत खूप सुखी’, असे आप्त-नातलगांना सांगणाऱ्या नागरिकांना पाण्याचा बेसुमार वापर करण्याची सवयच जडली आहे. नाशिक शहराला गंगापूर धरण आणि दारणा नदीवरील चेहडी बंधारा येथून पाणीपुरवठा केला जातो. साधारणपणे महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ३६० ते ३७५ तर चेहडी बंधाऱ्यातून सुमारे ३५ दशलक्ष लिटर याप्रमाणे एकूण सुमारे ३९५ ते ४०५ दशलक्ष लिटर पाणी पिण्यासाठी उचलले जाते. शहरातील ८५ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरात सुमारे १ लाख ६५ हजार नळजोडण्या महापालिकेमार्फत देण्यात आल्या आहेत. जुने नाशिक, पंचवटी यांसारख्या भागात अनेक ठिकाणी जलवाहिन्या तीन ते चार दशकापूर्वी टाकण्यात आल्या असल्याने त्या जीर्ण झालेल्या आहेत. त्यातच गेल्या सहा-आठ महिन्यात पाइपलाइन फुटण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने पाणीगळतीचे प्रमाणही वाढते आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात ३५८२ दशलक्ष घनफूट म्हणजे ६४ टक्के पाणीसाठा आहे. (मागील वर्षी याच दरम्यान ९३ टक्के पाणीसाठा होता) गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणात ४५ तर गौतमी-गोदावरीत ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १ जून ते १६ सप्टेंबर या दरम्यान नाशिक तालुक्यात सरासरीच्या ७५ टक्के तर ज्या तालुक्यातील पावसावर गंगापूर धरणाचा पाणीसाठा अवलंबून आहे, त्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात अवघा ३८ टक्के पाऊस झालेला आहे. पावसाने शहरात अधूनमधून हजेरी लावली असली तरी धरणातील पाणीसाठ्यात त्यामुळे खूप मोठी वाढ होऊ शकलेली नाही. सद्यस्थितीत शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा वैश्विक पातळीवरचा धर्मसोहळा सुरू आहे. कुंभमेळ्यातील तीनही शाही पर्वणींसाठी जिल्हा प्रशासनाने ५४० दशलक्ष घनफूट इतके पाणी राखीव ठेवले आहे. आतापर्यंत दोन्ही पर्वणी आणि इतरवेळी सुमारे २४३.५ दशलक्ष घनफूट इतके पाणी गोदावरीला सोडण्यात आले आहे. आणखी १०० ते १२० दशलक्ष घनफूट पाणी शुक्रवारी (दि.१८) होणाऱ्या अखेरच्या पर्वणीसाठी सोडले जाईल. तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये सुमारे ३ लाखाहून अधिक साधू व भाविकांचे वास्तव्य असल्याने महापालिकेला त्याठिकाणी २४ तास पाणीपुरवठा करावा लागतो. याशिवाय दरदिवशी गोदास्नानासाठी येणाऱ्या भाविकांचाही ताण वाढतोच आहे. पावसाळा आता अंतिम चरणात येऊन पोहोचला आहे. सप्टेंबर अखेर पाऊस परतीच्या वाटेवर असताना अद्याप गंगापूर धरणातील पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे ९० टक्क्यांवर जाऊन पोहोचलेला नाही. सद्यस्थितीतील वातावरण पाहता मोठ्या पावसाची चिन्हेही दिसून येत नाहीत. हवामान खात्याचेही अंदाज काळजाचे ठोके वाढवत आहे. अशा स्थितीत नाशिककरांनी पाणीवापराबाबत स्वयंस्फूर्तीने काही निर्बंध लादून घेणे गरजेचे आहे. परंतु, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अजूनही नाशिककर पाणीवापरावाबत बेफिकीर असल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)