पात्र उमेदवारांची यादी घोषित
By Admin | Updated: April 16, 2016 22:16 IST2016-04-16T22:15:10+5:302016-04-16T22:16:30+5:30
येवला, नांदगाव : पोलीसपाटील, कोतवाल पदाची भरती

पात्र उमेदवारांची यादी घोषित
येवला : येवला व नांदगाव तालुक्यातील १३२ रिक्त पोलीस-पाटील व १८ कोतवालपदाच्या भरतीसाठीची अर्ज भरण्याची व छाननीची प्रक्रिया ६ एप्रिल रोजी संबंधित गावच्या ग्रामपंचायतीच्या फलकावर परीक्षेस पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली आहे.
या भरतीप्रक्रियेसाठी परीक्षेस पात्र ठरलेल्या ९६० उमेदवारांची परीक्षा रविवारी, दि. २४ एप्रिल रोजी येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयात होणार असल्याची माहिती पोलीसपाटील व कोतवाल भरती समितीच्या अध्यक्ष तथा येवला उपविभागीय प्रांताधिकारी वासंती माळी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
येवला तालुक्यातील ७६ गावातील पोलीसपाटील पदासाठी ५५३ उमेदवार, ११ गावांच्या कोतवाल पदासाठी ४७ उमेदवार परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र ठरले आहेत. नांदगाव तालुक्यातील ५६ गावांतील पोलीसपाटील पदासाठी ३३८ उमेदवार, सात गावांच्या कोतवाल पदासाठी २२ उमेदवार परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र ठरले आहेत.
नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरी, (अनुसूचित जमाती), मंगळने व घाडगेवाडी, (अनुसूचित जमाती) या तीन गावांतून एकही उमेदवार पोलीसपाटील भरती परीक्षेसाठी पात्र ठरला नाही, तर मालेगाव करात येथे एका जागेसाठी कोतवाल भारतीसाठी एकही उमेदवार पात्र ठरला नाही.
प्रवेशपत्राबाबत काही अडचणी उद्भवल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन वासंती माळी यांनी केले आहे. पोलीस-पाटील आणि कोतवाल भरतीप्रक्रि या प्रथमच पारदर्शी पद्धतीने पार पाडली जात आहे. परीक्षेची पूर्ण तयारी झाली आहे. (वार्ताहर)