राज्यातील कृषी पुरस्कारांची यादी जाहीर

By Admin | Updated: August 12, 2014 02:02 IST2014-08-12T01:36:55+5:302014-08-12T02:02:24+5:30

राज्यातील कृषी पुरस्कारांची यादी जाहीर

List of agricultural awards in the state | राज्यातील कृषी पुरस्कारांची यादी जाहीर

राज्यातील कृषी पुरस्कारांची यादी जाहीर

 

नाशिक : दरवर्षी कृषी विभागातर्फे दिले जाणारे विविध कृषी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, सन २०१३ साठी त्यात राज्यातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार वारूळवाडी (ता. जुन्नर, पुणे) येथील शेतकरी अनिल मेहेर यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या १४ आॅगस्ट रोजी नाशिकला राज्यपाल के. शंकर नारायणन् यांच्या हस्ते व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येणार आहे.
येथील आरोग्य विद्यान विद्यापीठाच्या प्रांगणात १४ आॅगस्टला सकाळी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. नाशिकचे शरदराव ढोकरे (खेडगाव) यांना कृषिभूषण, तर दिलीप जेजीराम सूर्यवंशी (केळझर, बागलाण), उल्हास बहिरू जाधव (इगतपुरी) व दत्तू रामभाऊ ढगे (बेळगाव ढगा) यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ, तर येवल्याचे सदाशिव वामन शेळके यांना कृषिभूषणच(सेंद्रिय शेती) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: List of agricultural awards in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.