शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

महानगरातील १३५ दुकानांमधून मद्यविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 11:26 PM

नाशिक : शहर व परिसरातील १३५ मद्यविक्रीच्या दुकानांमधून शुक्रवारी मद्यविक्रीला जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे पालन करत प्रारंभ करण्यात आला. तर जिल्ह्यात कंटेन्मेंट झोनमधील १४५ दुकाने वगळता २३७ दुकाने सुरू झाली.

नाशिक : शहर व परिसरातील १३५ मद्यविक्रीच्या दुकानांमधून शुक्रवारी मद्यविक्रीला जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे पालन करत प्रारंभ करण्यात आला. तर जिल्ह्यात कंटेन्मेंट झोनमधील १४५ दुकाने वगळता २३७ दुकाने सुरू झाली.शुक्रवारी (दि.८) दिवसभरात हजारो लिटर मद्याची विक्री होऊन सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली. यात देशी-विदेशी मद्यासह बिअर आणि वाइनचाही समावेश आहे. दिवसभर झालेल्या विक्रीत विदेशीपेक्षा देशी दारू वरचढ ठरल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यातील मद्याचा वर्षाचा खप राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लिटरमध्ये येत असतो. त्यात वर्षात देशी दारूची विक्री साधारण एक कोटी ८३ लाख लिटर इतकी असते. विदेशी मद्याची विक्री ८८ लाख लिटरच्या आसपास होते.त्याचप्रमाणे बिअरची विक्री एक कोटी २४ लिटर होत असते. या सर्वांमध्ये वाइनची सहा लाख लिटरच्या आसपास सर्वांत कमी विक्री होते. गेल्या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला नाशिक जिल्ह्यातून मार्चअखेर दोन हजार ८१३ कोटी ९३ लाख ९८ हजारांचे उत्पन्न मिळाले होते. नागरिकांनी मिळालेल्या संधीचा फायदा उठवत खरेदीसाठी रांगा लावल्या.

टॅग्स :Nashikनाशिक