दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास
By Admin | Updated: May 19, 2017 16:58 IST2017-05-19T16:58:28+5:302017-05-19T16:58:28+5:30
दुचाकीचे टायर पंक्चर झाल्याने ते काढत असतानाच चोरट्यांनी डिक्कीतील सुमारे सव्वा लाखाची रोकड लंपास

दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दुचाकीचे टायर पंक्चर झाल्याने ते काढत असतानाच चोरट्यांनी डिक्कीतील सुमारे सव्वा लाखाची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि़ १६) दुपारच्या सुमारास पेठरोडवरील क्रांतीनगर परिसरात घडली़
कामटवाडे येथील इंद्रनगरीमधील रहिवासी श्रीकांत पुरुषोत्तम उपासनी (४०) हे कामानिमित्त पेठरोड परिसरात गेले होते़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचे टायर पंक्चर झाले़ तेथीलच एका दुकानात टायरचे पंक्चर काढत असताना चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख १० हजार रुपयांची रोकड चोरून नेली़
याप्रकरणी उपासनी यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी संशयितांविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविला आहे़