लायन्स, लायनेस क्लबचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:34 IST2018-08-10T21:33:23+5:302018-08-10T21:34:05+5:30
मनमाड: लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटी च्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी साधना पाटील यांची या वर्षीसाठी पुन्हा निवड करण्यात आली आहे.

लायन्स, लायनेस क्लबचा पदग्रहण सोहळा
मनमाड: लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटी च्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी साधना पाटील यांची या वर्षीसाठी पुन्हा निवड करण्यात आली आहे.सचिव- वैशाली वाणी, खजिनदार -रजनी शुळ तर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अमीत सिंग, सचिव- अरूण दराडे,खजिनदार-सुशिल संकलेचा यांची निवड करण्यात आली.या सर्व नुतन पदाधिकाºयांचा पदग्रहण समारंभ कौंसील चेअरमन संदीप मालू, गणेश धात्रक, राजेश कोठावदे,कल्पेष हेडा,डॉ.प्रताप गुजराथी,विजय जैन,श्शिकांत व्यवहारे, डॉ. संजय सांगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.महिलांसाठी विकासाभिमुख उपक्रम राबवण्याचा मनोदय नुतन अध्यक्ष साधना पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केला.रेखा येणारे, वर्षा कवीटकर, जयश्री कुंभार,सुरेखा धुमाळ, कविता पाटेकर,योगिता पठाडे,प्रतिभा चव्हाण,संगिता सोनार, वैशली गवळी,रेखा नाईक या नुतन सदस्यांना शपथ देण्यात आली.कार्यक्रमास लायन्स व लायनेस सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत कातकाडे व हर्षद गद्रे यांनी केले.