लायन्स क्लबच्या आॅक्टोबर सेवा सप्ताहाची सांगता
By Admin | Updated: October 9, 2015 22:31 IST2015-10-09T22:30:33+5:302015-10-09T22:31:12+5:30
लायन्स क्लबच्या आॅक्टोबर सेवा सप्ताहाची सांगता

लायन्स क्लबच्या आॅक्टोबर सेवा सप्ताहाची सांगता
नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक यांच्यातर्फे आॅक्टोबर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लबने ‘एक मिशन- सेवा जीवन’ या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे अनेक आरोग्य विषयक तसेच इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजन या सप्ताहात केले होते. या सप्ताहाचा सांगता सोहळा बुधवार (दि.७) पंडित कॉलनी येथील लायन्स क्लब सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येऊन उपस्थिताना राष्ट्रध्वजाप्रती शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकाश पठाडे यांनी सप्ताहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला तसेच या सांगता सोहळा कार्यक्रमात लायन्स क्लब नाशिकचे अध्यक्ष उमेश सोनवणे यांनी आॅक्टोबर सप्ताहाअंतर्गत आठवडाभर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.
लायन्स क्लब आॅफ नाशिक आयोजित ‘आॅक्टोबर सेवा सप्ताह’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी लायन्स क्लब आॅफ नाशिक यांच्यातर्फे घेण्यात येणारे उपक्रम अतिशय स्तुत्य असतात तसेच लायन्स क्लबच्या सदस्यांमार्फत करण्यात येणाऱ्या नियोजनामुळेच राबविण्यात येणारे उपक्रम यशस्वी होतात, असे मत व्यक्त केले. लायन्स क्लबला ५४ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बी. बी. चांडक यांनी या क्लबला शुभेच्छा दिल्या. तसेच या क्लबमधील सभासदांकडे अनुभवांचा साठा असल्याने अनेकांना या सदस्यांकडून शिकण्याची नामी संधी असल्याचे मत व्यक्त करतानाच ताण तणाव कमी करण्याच्या दिशेने लायन्स क्लबने उपक्रम राबविण्यास हवे, असे मत चांडक यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाअंतर्गत दिंडोरी रोड येथील महाराष्ट्र टी. बी. सॅनोटोरिअम या हॉस्पिटलला किटकनाशक मशीन देणाऱ्या लायन खेतासी पटेल तसेच चुंचाळे येथील सिद्धिविनायक अपंग शाळेला अर्थिक मदत करणाऱ्या ला. महेश तिवारी आणि ला. सुभाष बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ७१ शालेय विद्यार्थ्यांना दत्तक घेणाऱ्या ला. आर्किटेक्ट सुरेश गुप्ता आणि ला. कमल गुप्ता या गुप्ता कुटुंबीयांचादेखील सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष उमेश सोनवणे, आॅक्टोबर सेवा सप्ताहाचे अध्यक्ष प्रकाश पठाडे, सचिव दीपक रत्नपारखी, खजिनदार सुरेश पाटील, माजी प्रांतपाल विनोद कपूर, अभय चोकसी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा सोनवणे आणि रत्नप्रभा पठाडे यांनी केले, तर आभार दीपक रत्नपारखी यांनी मानले. (प्रतिनिधी)