लायन्स क्लब सुप्रीमची नूतन कार्यकारिणी जाहीर
By Admin | Updated: July 17, 2014 22:01 IST2014-07-17T01:02:44+5:302014-07-17T22:01:54+5:30
लायन्स क्लब सुप्रीमची नूतन कार्यकारिणी जाहीर

लायन्स क्लब सुप्रीमची नूतन कार्यकारिणी जाहीर
नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक सुप्रीमची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्याम केदार यांनी नूतन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
लायन्स क्लब सुप्रीमच्या नूतन ५पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल ग्रीन व्ह्यू येथे झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मल्टीपल कौन्सिल अध्यक्ष द्वारका जालन, चंद्रहास शेट्टी, प्रांतपाल विनोद कपूर, सुप्रीमचे संस्थापक जे. पी. जाधव, सी. आर. आव्हाड, पोखरकर, तसेच इतर क्लबचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. मावळते अध्यक्ष सी. आर. आव्हाड यांच्या हस्ते श्याम केदार यांनी सूत्रे स्वीकारली. इतर सदस्यांमध्ये अॅड. जयंत जायभावे, अॅड. प्रकाश आहुजा, अॅड. रासवळकर, अॅड. ढोमसे, जिभाऊ सोनवणे, जगदीश केदार, दीपक मगर, राजेश गिरमे यांनीही शपथ घेतली. सूत्रसंचालन डॉ. अशोक निकम यांनी केले. (प्रतिनिधी)