सर्पमित्र वन्यजीवांबाबत जागृतीसाठी दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST2021-07-17T04:13:07+5:302021-07-17T04:13:07+5:30
चर्चासत्रात पुणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन वंजारी यांनी साप आणि वन्यजीव यांना दिल्या जाणाऱ्या औषधोपचारांबाबत माहिती दिली. डॉ ...

सर्पमित्र वन्यजीवांबाबत जागृतीसाठी दुवा
चर्चासत्रात पुणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन वंजारी यांनी साप आणि वन्यजीव यांना दिल्या जाणाऱ्या औषधोपचारांबाबत माहिती दिली. डॉ आशिष सोनवणे यांनी प्रथमोपचारावर तर नवी मुंबई येथील वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोचे विभागीय अधिकारी योगेश वरकड यांनी सर्प व वन्यजीव तस्करीबद्दल सांगितले. इको एको फाउंडेशनचे सदस्य व जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक वैभव भोगले यांनी सर्प पकडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर कसा करावा व साहित्य कसे वापरावे, यावर मार्गदर्शन केले. सहायक उपवनसंरक्षक रणदिवे यांनी वन्यजीव अधिनियम १९७२ याबद्दल माहिती दिली. ओझर येथील निसर्ग संवर्धन क्लब संस्थेचे सर्पमित्र सुशांत रणशूर, नाशिक येथील वन्यजीव संरक्षक संस्थेचे धीरज शेकोकार, निफाड येथील मंगेश वाकळे, पिंपळगाव बसवंत येथील राजेंद्र पवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली. चर्चासत्राला जिल्ह्यातील ७२ सर्पमित्र व वनअधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. नाशिक पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी प्रास्ताविक करत सर्पमित्रांना लवकरच ओळ्खपत्रांचे वाटप करण्यात येईल, अशी घोषणा केली.
कोट...
सदर बैठक ही सर्पमित्र व वनविभागातील चर्चेची पहिली पायरी ठरली. यापुढे कोरोनाचे नियम शिथिल झाल्यावर सर्पमित्र व वनविभागात समन्वय साधून कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी त्याची मदत होईल.
- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, पूर्व विभाग, नाशिक