शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

वीज पोहोचविण्यासाठी पोस्टमन बनणार दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 01:27 IST

भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देशोभा मधाळे : दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत जाऊन करणार सर्वेक्षण

नाशिक : भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, राष्टÑ उभारणीच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे, अशी माहिती नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.नाशिक टपाल विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय टपाल तिकीट संग्रहाच्या प्रदर्शनानिमित्त मधाळ या शहरात आल्या आहेत. शनिवारी (दि.२०) महात्मा फुले कलादालनात प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, देशात अशी कुठलीही जागा शिल्लक नाही, जेथे टपाल खाते पोहोचलेले नाही, त्यामुळे टपालाच्या संपर्क जाळ्याचा वापर केंद्रीय ऊर्जा विभागाकडून केला जाणार आहे. देशातील कानाकोपऱ्यात वीज पोहोचावी आणि जनतेच्या प्रगतीच्या वाटा उजळून निघाव्या, या उद्देशाने ऊर्जा विभागाला टपाल विभाग महत्त्वाचे सहकार्य करणार आहे. त्यादृष्टीने पोस्टमन ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचा उपक्रम राबविणार आहे. हा उपक्रम पुढील वर्षअखेर पूर्णत्वास येणार असल्याचे मधाळ यांनी सांगितले. राष्टÑ उभारणीच्या कार्यात टपाल विभाग नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे.वीज सर्वेक्षण मोहिमेसाठी टपाल विभागाची करण्यात आलेली निवड ही सुवर्ण संधी समजून प्रत्येक पोस्टमन त्यासाठी योगदान देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.टपाल खात्याकडूनही ‘डिजिटल’चा स्वीकारकाळानुरूप टपाल विभागाने कात टाकली आहे. संदेशवहनाची विविध माध्यमे आधुनिकतेच्या काळात उदयास आल्यानंतर टपालाचे महत्त्व कमी होईल, असे बोलले जात होते; मात्र या काळात टपाल विभागाचे महत्त्व व जबाबदारी अधिकाधिक वाढली आहे.च्इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक असो अथवा केंद्र सरकारच्या विविध योजनांचा कारभार असो, टपाल विभाग नागरिकांपर्यंत सुरळीतपणे पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. ‘दर्पण’ योजनेद्वारे ग्रामीण भागातील टपालाची उप कार्यालये, शाखा कार्यालयदेखील लवकरच डिजिटल होणार असल्याचे शोभा मधाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसNashikनाशिकelectricityवीज