शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या धर्तीवर नाशिकमधील मॉलमध्येही फ्री पार्कीग ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 16:49 IST

नाशिक- पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्कींग फ्री करण्याचा प्रस्ताव असून महापौर रंजना भानसी देखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनगरसेविका किरण गामणे यांचा प्रस्तावमहापौर रंजना भानसीही राजी

नाशिक- पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्कींग फ्री करण्याचा प्रस्ताव असून महापौर रंजना भानसी देखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.शहरात मॉल्सची संख्या वाढत आहे. परंतु सर्वच ठिकाणी पार्कींगचे शुल्क आकारले जातात. अनेक मॉल्सला महापालिकेने वाहनतळाच्या जागेसाठी चटई क्षेत्र मुक्तची सवलत दिली आहे. मात्र, पार्कींगसाठी शुल्क आकारून संबंधीत मॉल्सचालक नियमाचा भंग करतात. अनेक मॉलमध्ये तर दुचाकी किंवा चारचाकी मोटार प्रवेशाच्या वेळीच शुल्क घेऊन पावती दिली जाते आणि नंतर मात्र ती पावती मॉलमधून बाहेर पडताना परत घेतली जाते. त्यामुळे शासनाच्या कर चोरीचा हा प्रकार असल्याची देखील चर्चा आहे. मॉल्स चालक शुल्क घेत असल्याने अनेक नागरीक मॉलच्या बाहेरच वाहने लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होत असते.दरम्यान, महापालिकेच्या नगररचना अधिनियमात व्यावसायिक आस्थापनांसाठी वाहनतळासाठी जागा सोडणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांचा भार त्यांनीच सांभाळला पाहिजे परंतु मॉल्स चालक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने निशुल्क वाहनतळ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेविका किरण गामणे यांनी यासंदर्भात गेल्या गुरूवारी (दि.२०) झालेल्या महासभेत प्रस्ताव मांडला होता. महापालिकेच्या एका जागेच्या पोटनिवडणूकीमुळे आचारसंहिता सुरू असल्याने २५ जून रोजी यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, महापौर रंजना भानसी यांनी नागरी हिताचा निर्णय असल्याने तो अमलात आणला जाईल असे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाParkingपार्किंग