पाच लाख भाविक आदिमायेच्या चरणी लीन
By Admin | Updated: April 2, 2015 00:47 IST2015-04-02T00:27:48+5:302015-04-02T00:47:51+5:30
चैत्रोत्सव : खान्देशातील भाविकांची लक्षणीय उपस्थिती

पाच लाख भाविक आदिमायेच्या चरणी लीन
कळवण : रथ काय चालना ,चालना वाणी ना गड ले ,बोल सप्तश्रुंग मत कि जय,अशा गाण्याच्या तालासुरात वाजत गाजत ,नाचत लाखो देवी भक्तांचे पाय मजल दरमजल करीत कळवण मार्गे नांदुरी गडाकडे मार्गस्थ झाले . पहाटे ५ वाजेपासून तर कळवण शहरातील रस्ता देवी भक्तांनी फुलून गेल्याने मिनिटा -मिनिटाला वाहतूक ठप्प होवून वाहतुकीची कोंडी होत असल्याने रस्ता एकेरी झाला आहे, कळवणला महाप्रसाद तर भेंडी येथे उसाचा रस वाटप करण्यात येत असून लाखो देविभक्तानी याचा लाभ घेतला
रामनवमी पासून सुरु झालेल्या चैत्रौत्सवाच्या पाचव्या दिवसअखेर पाच लाख भाविकांनी तर आज बुधवारी देविभक्तानी सकाळीस पासून एकच गर्दी करून एक लाखहून अधिक भाविक आदिमायेच्या चरणी लीन झाले , लाखो भक्तांनी महाप्रसादाचा भोजनालयात लाभ घेतला असून आज बुधवारी पंचवीस हजार भक्तांनी लाभ घेतला असल्याची माहिती सप्तश्रुंग निवासिनी देवी ट्रस्टच्या सूत्रांनी दिली दर्शनासाठी गर्दी होत असल्याने बारी लावून भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत आहे
कळवण ते नांदुरी रस्ता भाविकांनी फुलून गेला असून रण रणत्या उन्हाची पर्वा न करता आदिमायेच्या दर्शनाची आस घेवून देवी भक्त सप्तश्रुंग गडाकडे वाटचाल करीत आहे , गेल्या ४८ तासात दोन लाख भाविक मार्गस्थ झाल्याचा अंदाज असून ठिकठिकाणी देवी भक्तांच्या सेवेसाठी दानशूर समाजधुरिणी अन्नदान ,रसवंती , फराळ .पाणीवाटप , आरोग्य सेवा यासह महाप्रसादाचे आयोजन केले असून विठेवाडी ते कळवण ते नांदुरी या रस्त्यावर विविध संस्था ,संघटना ,मित्र मंडळ यांच्याकडून मदतीचा हात देविभाक्ताना मिळत असून माणुसकीची प्रचीती बघावयास मिळत आहे. खान्देशातून लाखो भाविक चैत्रौत्सवात पायी सप्तश्रुंगगडावर जावून आदिमायेच्या चरणी लीन होवून दर्शन घेतात अशा लाखो खान्देशवाशीय देवीभक्तांना मोफत उसरस वाटप करून आत्माराम तृप्त करण्याचे काम धुळे शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले यांचे महाले प्रतिष्ठान करीत आहे मागील वर्षी 2 लाख भक्तांनी लाभ घेतला होता गेल्या ८ वर्षापासून भेंडी (कळवण) चौफुलीवर खान्देशातून सप्तश्रुंग गडावर पायी जाणार्या देवीभक्तांसाठी मोफत उस रसाचे वाटप केले जात आहे. (वार्ताहर)