...आता भरदिवसाही सुरू राहणार दुचाकींचा दिवा

By Admin | Updated: April 2, 2017 02:09 IST2017-04-02T02:09:02+5:302017-04-02T02:09:12+5:30

दुचाकीचा दिवा दिवसा सुरू असल्याचे दिसल्यास अनवधानाने चालकाला विसर पडल्याचा सर्वसामान्यांचा समज असतो.

... the lights of the two day will continue | ...आता भरदिवसाही सुरू राहणार दुचाकींचा दिवा

...आता भरदिवसाही सुरू राहणार दुचाकींचा दिवा

अझहर शेख नाशिक
दुचाकीचा दिवा दिवसा सुरू असल्याचे दिसल्यास अनवधानाने चालकाला विसर पडल्याचा सर्वसामान्यांचा समज असतो. त्यामुळे सर्वसामान्यांकडून अशा वाहनचालकांना हाताचा इशारा करून दिवा सुरू असल्याचे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आजपर्यंत होत आला आहे; मात्र आता भरदिवसा दुचाकींचा दिवा लागलेला असल्यास नागरिकांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, कारण चालकाच्या हातात आता दिवा बंद करणे राहिलेले नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘बीएस-४’ इंजिनच्या नवीन दुचाकी बाजारात आल्या असून, गुढीपाडव्यापासून या दुचाकींची विक्रीदेखील सुरू झाली आहे. या नवीन दुचाकींचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य दिवा (हेड लाइट) स्वयंचलित आहे. त्यामुळे भरदिवसाही दिवा सुरू असलेल्या दुचाकी रस्त्यांवर धावताना दिसून येत आहेत. हळूहळू अशा दुचाकींची संख्या रस्त्यावर वाढणार असून, दिवसाही दुचाकींचा दिवा चालूच राहणार आहे.

Web Title: ... the lights of the two day will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.