शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून महिला ठार एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 21:31 IST

दिंडोरी : परतीच्या पावसाने दिंडोरी येथील श्रीरामनगर येथील यमुनाबाई गांगुर्डे ही महिला अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाली. गांडोळे येथील सुनीता भोये ही महिला गंभीर जखमी झाली, तर राशेगाव येथे वीज पडल्याने बैल ठार झाला आहे,

ठळक मुद्देदिंडोरी : राशेगाव येथे वीज पडून बैल ठार ; परतीचा पाऊस

दिंडोरी : परतीच्या पावसाने दिंडोरी येथील श्रीरामनगर येथील यमुनाबाई गांगुर्डे ही महिला अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाली. गांडोळे येथील सुनीता भोये ही महिला गंभीर जखमी झाली, तर राशेगाव येथे वीज पडल्याने बैल ठार झाला आहे,परतीच्या पावसाने दिंडोरी सह तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह हजेरी लावली गुरु वार व शुक्र वारी दोन दिवसांच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिंडोरी श्रीराम नगर येथील यमुनाबाई निवृत्ती गांगुर्डे (५५) यांच्यावर रस्त्याच्याकडेला शेळ्या चारत असताना वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान गांडोळे येथील सुनीता नंदाराम भोये (४५) ही महिला शेतात काम करत असताना वीज पडल्याने गंभीर जखमी झाली. तीला नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर राशेगाव येथे शेतकरी शिवाजी भीमा इचाळ यांच्या बैलावर वीज पडल्याने त्याचा मृत्यु झाला.दिंडोरी तालुक्यात शुक्र वारी चार वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली, दिंडोरी शहरात काही भागात गाराही पडल्या. अवनखेड, परमोरी, लखमापुर फाटा, वनारवाडी, मोहाडी, आक्र ाळे, पालखेड परिसरात मुसळधार पाऊस झाला तर ओझरखेड कादवा कारखाना, निळवंडी, पाडे, उमराळे, ढकांबे आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.तळेगाव दिंडोरी परिसरात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने तळेगाव जवळील नाल्याला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी रस्त्यावर आले त्यामुळे वाहतूक एक तास ठप्प झाली होती. परतीच्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. खतवड परिसरात टोमॅटो, कारले, भोपळे पिकाचे मोठे नुकसान झाले. तर अनेक झाडे उन्मळून पडले तसेच काही घरे व शेडचे पत्रे उडून गेले.गडावर पायी चालणाºया भाविकांचे हालनवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक पायी जातातशुक्र वारी चार वाजता झालेल्या पावसामुळे भाविकांचे मोठे हाल झाले तसेच शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने भाविकांचे हाल झाले. अनेकांना सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात