शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

उत्सवासाठी अल्पदरात वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:35 IST

महावितरणने गणेशोत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली असून, मंडळांनी सुरक्षेसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

नाशिकरोड : महावितरणने गणेशोत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली असून, मंडळांनी सुरक्षेसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.नाशिक शहरात गणेश उत्सवाााठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आतापर्यंत जवळपास १०० गणेश मंडळांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ५५ मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यात आली आहे. नाशिक शहर विभाग एक अंतर्गत ४० तर नाशिक शहर विभाग दोन अंतर्गत २५ मंडळांचा त्यात समावेश आहे.सार्वजनिक गणेश उत्सवासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या वीज यंत्रणेची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.गणेशोत्सवासाठी तात्पुरती व्यवस्थागणेशोत्सवासाठी प्रतियुनिट ३ रुपये २० पैसे अधिक वहन कर १ रुपये १८ पैसे असे एकूण ४ रुपये ३८ पैसे प्रति युनिट या अल्प दराने तात्पुरती वीज जोडणी महावितरणकडून दिली जात आहे. सर्व उपविभागीय कार्यालय व स्थानिक शाखा कार्यालयांना तात्पुरती वीजजोडणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.अपघात विरहीत उत्सवासाठी गणेश मंडळांनी मंडप व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या व विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याची खबरदारी घ्यावी. अनाधिकृत वीज वापरामुळे घडणाºया अनुचित घटनेस संबंधीत गणेश मंडळ व अनाधिकृत वीज पुरवठा देणारा ग्राहक जबाबदार राहाणार आहे. त्यामुळे गणेश उत्सव मंडळांनी सुरक्षितेच्या दृष्टीने अधिकृत वीज जोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणच्या वतीने केले आहे.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक